मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shahrukh Khan: 'पठाण' च्या अभूतपूर्व यशानंतर आता टायगर 3 साठी सज्ज झाला किंग खान; असा असेल लूक

Shahrukh Khan: 'पठाण' च्या अभूतपूर्व यशानंतर आता टायगर 3 साठी सज्ज झाला किंग खान; असा असेल लूक

टायगर 3

टायगर 3

पठाण मध्ये सलमान खानच्या कॅमिओ नंतर आता शाहरुखही सलमानच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी : शाहरुख खानचा 'पठाण' 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटातून शाहरुखची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील बहुतांश व्हिडिओ शाहरुख आणि सलमान खानच्या अॅक्शन सीक्वेन्सचे आहेत. 'पठाण'मध्ये सलमानचा सुमारे 20 मिनिटांचा कॅमिओ आहे आणि चाहत्यांना दोघांची जुगलबंदी आवडली आहे. आता 'पठाण'मध्ये सलमानने शाहरुखला 'वाचवले', पण आता 'पठाण'ची पाळी आहे. होय, आता शाहरुखही सलमानच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

शाहरुखही सलमानच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार ही बातमी खूप आधी आली होती, पण दोघेही अद्याप अॅक्शन सीन शूट करू शकलेले नाहीत. याचे कारण म्हणजे दोन्ही स्टार्ससोबत डेट नसणे. मात्र, आता शाहरुख लवकरच सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी त्यांनी एक खास तयारीही केली आहे.

हेही वाचा - Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर' मध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; वाचून म्हणाल क्या बात!

ई- टाइम्स च्या वृत्तानुसार, शाहरुख खान फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सलमानसोबत 'टायगर 3' त्याचे काही भाग शूट करेल. यासोबतच शाहरुख आता त्याच्या 'पठाण' च्या लूकमधून बाहेर पडला असून 'टायगर 3' मधील सलमानसोबतच्या अॅक्शन सीनसाठी शाहरुख साठी साठी खास विग बनवण्यात आला आहे. म्हणजेच तो आता नव्या रुपात दिसणार आहे.

'पठाण' आणि 'टायगर 3' हे दोन्ही चित्रपट स्पाय युनिव्हर्सवर आधारित आहेत. 'पठाण'ची कथा जिथून संपते तिथून 'टायगर 3'ची कथा सुरू होईल. YRF च्या स्पाय युनिव्हर्समध्ये 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण' आणि 'टायगर 3' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

शाहरुख आणि सलमान खान जवळपास सहा महिन्यांपासून टायगर 3 च्या सीक्वेन्सची तारीख निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही कलाकार आपापल्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहेत. सलमान 'किसी का भाई किसी की जान'मध्ये व्यस्त आहे, जो यावर्षी एप्रिलमध्ये ईदच्या वेळी पडद्यावर येणार आहे. तर शाहरुख खान दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीचा 'जवान' आणि राजकुमार हिरानीचा पुढचा चित्रपट 'डंकी'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र, 'पठाण'मधील त्यांच्या सीक्‍वेन्‍सची निर्माण झालेली क्रेझ लक्षात घेता, सलमान आणि शाहरुख लवकरच त्यांच्या जासूसी सीक्‍वेन्‍स शूट करण्‍याची तारीख फायनल करतील, असे सांगितले जात आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या 'पठाण' या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. देशात 5500 आणि परदेशात 2500 स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या सिद्धार्थ आनंदच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली. दुस-या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर जगभरात 113 कोटींची कमाई केली आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salaman- shahrukh meets, Salman khan, Shah Rukh Khan