मुंबई, 19 जानेवारी: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा पठाण या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काहीच दिवस उरले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली आहे. काहींनी बेशरम रंग या गाण्यावर वाद घातला तर काहींनी शाहरुख खानवर प्रश्न उपस्थित केले. मात्र या संपूर्ण प्रकरणावर दीपिका पदुकोण किंवा किंग खान यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. निर्मात्यांनीही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र आता शाहरुख खानने पठाण आणि ‘बेशरम रंग’ गाण्याबाबत पहिल्यांदाच मौन सोडले आहे. सध्या त्याचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. यशराज फिल्म्सने पठाणशी संबंधित शाहरुख खानची मुलाखत शेअर केली आहे. जिथे अनेक प्रश्न आहेत आणि किंग खान प्रत्येकाला उत्तर देत आहे. तो त्याचे सहकलाकार जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्यावरही प्रतिक्रिया देतो. या मुलाखतीतील चौथा प्रश्न बेशरम रंग या गाण्याशी संबंधित होता. त्याला विचारण्यात आले की, बेशरम रंग या गाण्याचे शूटिंग स्पेनमध्ये झाले आहे, तुमचा शूटिंगचा अनुभव कसा होता? हेही वाचा - Ved Box Office Collection: ‘वेड’ची कोटीच्या कोटी उड्डाणे; इतक्या कोटींचा टप्पा गाठल्यावर रितेश देशमुख म्हणाला… या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला, ‘दीपिका एक उत्तम अभिनेत्री आहे. अक्शन सीन्स करताना ती मला माझ्यापेक्षा वरचढ वाटली. चित्रपटात ती एकीकडे ‘बेशरम रंग’सारखं गाणं करत आहे आणि दुसरीकडे एका मुलाला उचलून त्याला मारताना दिसत आहे. मला वाटतं, दीपिकासारखी अभिनेत्रीचं ‘बेशरम रंग’ या गाण्याला इतक्या चांगल्याप्रकारे सादरीकरण करू शकते.’’ या शूटसाठी सिद्धार्थ आणि निर्मात्यांनी अतिशय खास लोकेशन निवडल्याचे शाहरुख खानने सांगितले. मी स्वतः असे लोकेशन कधी पाहिले नव्हते. हे खूप सुंदर ठिकाण आहे. तेव्हा मी मुलांना घेऊन गेलो होतो आणि त्यांनीही तिथे मजा केली.
King Khan’s 32-year-old dream comes true as he turns an action hero in Pathaan! Watch all the revelations of @iamsrk as he gears up for the release of his first out and out action film #Pathaan
— Yash Raj Films (@yrf) January 18, 2023
You can’t miss this one! pic.twitter.com/QzRvEZZt3T
तसेच यावेळी शाहरुख खानने जॉन अब्राहमबद्दलबोलला आहे. त्याच्याविषयी बोलताना किंग खान म्हणाला कि, ‘मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखतो. आम्ही अनेकदा भेटलो देखील आहोत. तो लाजाळू माणूस आहे. तो एक उत्तम अभिनेता आहे. खलनायक बनण्यासाठी त्याने घेतलेली जोखीम मोठी आहे. अॅक्शन सीन्स करतानाही मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. सुरुवातीला तो मला कुठे मारेल या सीनपासून लाजत होता. तेव्हा मी एवढेच म्हणालो की मला मारणे शक्य होणार नाही. मला खात्री आहे की पठाण रिलीज झाल्यावर जॉन अब्राहमच्या व्यक्तिरेखेला चांगला प्रतिसाद मिळेल. मध्यंतरी जॉन आणि शाहरुखमध्ये वाद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण शाहरुख खानने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे त्यावर पडदा पडला आहे.
शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख ‘पठाण’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.