उर्फी जावेद नेहमीच तिच्या आउटफिट्स आणि फॅशन सेन्सने लोकांना आकर्षित करते. तिच्या आउटफिट्समुळे तिला खूप ट्रोल केले जात असले तरी ती तिच्या फॅशन गेमशी तडजोड करत नाही.
नुकताच उर्फीनं तिच्या नो मेकअप लूकमधील सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे?' उर्फीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
या प्रश्नाला उत्तर देताना एका नेटकऱ्याने उर्फी जावेदची तुलना राखी सावंतशी केली. युजरने लिहिले की, "तू मेकअपशिवाय आणि सुजलेल्या चेहऱ्यासह राखी सावंतसारखी दिसतेस."