'महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही', केंद्रीय यंत्रणांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास करण्याची कुटुंबीयांची मागणी

'महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही', केंद्रीय यंत्रणांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास करण्याची कुटुंबीयांची मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी केंद्रीय संस्थांनी करावी अशी मागणी त्याचे कुटुंबीय करत आहेत. त्याचप्रमाणे गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्याच्या मामांनी केली आहे.

  • Share this:

पटना (बिहार), 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांवर आणि संपूर्ण सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'तो आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता. त्याच्याबाबतीत काहीतरी चुकीचे घडले असून महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे केंद्रीय संस्थांनी याचा तपास करावा', अशी मागणी सुशांतचे कुटुंबीय करत आहेत.

वयाच्या 34 व्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जगाचा निरोप घेतला. वांद्रे येथील राहत्या घरी त्याने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. या प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुशांंतचे मामा आरसी सिंह यांनी रविवारी केली होती. सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या घरापर्यंत पोहोचताच त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्याच्या पटना येथील घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान सुशांतच्या मामांनी ही अशी मागणी केली आहे की या प्रकरणाची न्यायीक पद्धतीने तसंच सीबीआय चौकशी व्हावी. राजपूत महासभेच्या वतीने त्यांनी ही मागणी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 'महाराष्ट्रात एका राष्ट्रवादी तरूणाची हत्या झाली असून असे तरूण आता महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत. सुशांत आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

(हे वाचा-अंकितानं सुशांतच्या लगावली होती कानशिलात, नाईट क्लबमध्ये 'त्या' काय घडलं)

सुशांत सिंह राजपूत याला रात्री 2 वाजता त्याच्या घरातील नोकराने शेवटचा ज्यूस दिला होता. त्यानंतर थेट आज दुपारी सुशांतचं जेवण घेऊन नोकर गेला. बराच वेळ आवाज दिल्यानंतरही सुशांतने दार न उघडल्याने त्याने सुशांतच्या मित्रांच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. . भरपूर प्रयत्न करूनही दरवाजा तुटला नाही. अखेर सुशांतच्या मॅनेजरने एका चावीवाल्याला बोलावून घेतलं. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. मात्र समोर दिसला तो सुशांतचा मृतदेह. हे दृश्य बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांना फोन करण्यात आला आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर चावीवाल्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.

(हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येआधीचे 12 तास! वाचा नेमकं काय घडलं)

सुशांतच्या कॉल डेटाच्या साहाय्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्याने कोणतीच सुसाइड नोट लिहून ठेवली नसल्याने तपास अवघड आहे. त्याच्या कॉल डेटाच्या साहाय्याने पुढील तपास केला जाणार आहे. सध्या हत्या आणि आत्महत्या या दोन्ही शक्यता पडताळून तपास केला जात आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 15, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या