स्ट्रगलच्या काळात अवघी 250 रुपये कमाई, अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवताना असे होते सुशांतचे दिवस

स्ट्रगलच्या काळात अवघी 250 रुपये कमाई, अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवताना असे होते सुशांतचे दिवस

अभिनय क्षेत्रामध्ये सुरूवातीच्या काळात सुशांतची कमाई अवघी 250 रुपये होती. यशस्वी झाल्यानंतर त्याने चंद्रावर देखील जमीन खरेदी केली होती.

  • Share this:

मुंबई, 14 जून : छोटा पडद्यावर काम करताना हजारोंच्या गळ्यातील ताइत झालेल्या सुशांत सिंग राजपूतने अल्पावधीच बॉलिवूडवरही राज्य केले. त्याने साकारलेला धोनी तर अनेकांच्या स्मरणात राही. मात्र त्याचं आज अकाली जाण सर्वांच्याच मनाला चटका लावणारं ठरलं आहे. त्याच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. खूप कष्ट करून त्यानं बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केल्याचे जाणकार सांगतात. अभिनय क्षेत्रामध्ये सुरूवातीच्या काळात सुशांतची कमाई अवघी 250 रुपये होती. त्यानंतर यशस्वी झाल्यानंतर त्याने चंद्रावर देखील जमीन खरेदी केली होती. तिथे जाण्याचं स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं, मात्र ते पूर्ण होण्याआधीच वयाच्या 34व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.

एका मुलाखती दरम्यान सुशांतने त्यांच्या मेहनतीबाबत भाष्य केले होते. 250 रुपये कमाई तर होतीच पण त्याचबरोबर त्याने 6 जणांबरोबर रुम देखील शेअर केली आहे. त्याने अनेकदा अनेक चित्रपट कलाकारांबरोबर बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे.

(हे वाचा-एका आठवड्याआधीच सुशांतनं दिले होते आत्महत्येचे संकेत?

खूप वर्ष स्ट्रगल केल्यानंतर त्याला 2008 मध्ये पहिला शो मिळाला होता. 'किस देश में है मेरा दिल' यामध्ये त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबरोबरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे तर सुशांत घराघरात पोहोचला. त्या दोघांच्या नातेसंबधची देखील खूप चर्चा झाली होती. 2013 मध्ये 'काय पो छे' हा पहिला सिनेमा केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

(हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेता रितेश देशमुखने या शब्दांत व्यक्त केला धक्का

एके काळी 2 मालाडमध्ये एका टू बीएचकेमध्ये राहणाऱ्या सुशांतने 20 कोटी खर्च करत पाली हिलमध्ये पेंट हाऊस देखील खरेदी केले होते. या घराच्या लिव्हिंग रुमला तो ट्रॅव्हलिंग रुम म्हणत असे. त्याने अवकाश निरिक्षणासाठी घरामध्ये एक मोठा 'टेलिस्कोप' देखील बसवून घेतला होता, ज्याला तो 'टाइम मशिन' म्हणत असे. 2018 मध्ये त्याने चंद्रावर जमिन खरेदी केली होती. त्याची ही जागा ‘सी ऑफ मसकोवी’ याठिकाणी आहे. सुरूवातीच्या काळात 250 रुपये कमाई करणारा सुशांत त्याच्या चित्रपटासाठी 5 ते 7 कोटींचे मानधन घेत असे. धोनीप्रमाणेच सुशांत देखील बाईक आणि गाड्यांचा शौकीन होता. काही महागड्या गाड्या त्याच्या ताफ्यामध्ये होत्या.

First published: June 14, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading