Home /News /entertainment /

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या आत्महत्येआधीचे 12 तास! वाचा नेमकं काय घडलं

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या आत्महत्येआधीचे 12 तास! वाचा नेमकं काय घडलं

मात्र सुशांतनं आत्महत्येआधी काय काय केलं याची माहिती पोलिसांनी दिली आहे, त्यानुसार असे होते आत्महत्येआधीचे सुशांतचे 12 तास.

    मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनं संपूर्ण देशाला हादरून सोडलं. 34 वर्षीय सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचललं यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाही आहे. अद्याप सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण समोर आलं नसलं तरी, तो नैराश्येत होता हे खरं आहे. पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही आहे. मात्र सुशांतनं आत्महत्येआधी काय काय केलं याची माहिती पोलिसांनी दिली आहे, त्यानुसार असे होते आत्महत्येआधीचे सुशांतचे 12 तास. वाचा-सुशांतचा 'तो' फोटो पोस्ट करत असाल तर सावधान! होऊ शकते कारवाई >> आत्महत्येआधी म्हणजेच शनिवारी रात्री सुशांतने मित्राला फोन केला होता. मात्र त्यानं फोन उचलला नाही. तो मित्र कोण होता याबाबत माहिती मिळाली नाही आहे. मुंबई पोलीस सध्या सुशांतचा फोन ट्रॅक करत आहे. >> रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुशांत सकाळी 6 वाजता उठला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत आपल्या बेडरुममध्येच होता. >> सकाळी 9.30च्या सुमारात सुशांतनं आपल्या नोकराकडून ज्यूस मागवला. ज्यूस प्यायल्यानंतर तो पुन्हा आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. सुशांतच्या घरात 2 स्टाफ, एक केअर टेकर आणि एक कुक राहतात. >> त्यानंतर 11.30च्या सुमाराच कुकनं दरवाजा वाजवला. जेवणाचा मेन्यू विचारण्यासाठी. मात्र सुशांतनं दरवाजा उघडला नाही. सुशांतचा झोपला असावा, असे समजून कुक निघून गेला. >>त्यानंतर दुपारी 1च्या सुमारात कुकनं पुन्हा दार वाजवले. मात्र आतून कोणी आवाज दिला नाही. त्यानंतर कुक आणि नोकरनं त्याच्या घरी असलेल्या मॅनेजरला बोलवलं. मॅनेजरनं दार जोरात वाजवलं, पण आतून काही आवाज नाही आला. >> त्यानंतर सुशांतच्या बहिनीला फोन लावण्यात आला. त्याची बहिण गोरेगाव इथं राहते. >>त्यानंतर चावीवाल्याच्या मदतीनं दरवाजा खोलण्यात आला. तेव्हा सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. >>या घटनेनंतर पोलिस आयुक्त रामबीर सिंग यांना दुपारी 2 वाजता फोन आला. त्यानंतर नंतर मुंबई पोलिस आयुक्तांनी डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि वांद्रे पोलिस कर्मचारी सुशांतसिंग राजपूत यांच्या घरी पाठवले. >>सुशांतवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या वडिलांसह त्याचे कुटुंब मुंबईत पोहचले आहे. रविवारी रात्री उशीरा सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, यात त्यानं आत्महत्याचं केल्याचं निष्पण्ण झालं. वाचा-सुशांतने कमी वेळात कमवली इतकी संपत्ती, आकडेवारी आली समोर संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या