मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) रविवारी आत्महत्या करत सर्वांनाच धक्का दिला. वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली, अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी सुशांत नैराश्येत होता. पोलिसांना सुशांतच्या घरून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. असे सांगितले जात आहे की सुशांत करिअर आणि वैयक्तिक आयुष्यामुळं नैराश्येत होता. सुशांत सिंह राजपूतला सर्वात आधी ओळख मिळवून दिली आणि घराघरात पोहोचला तो झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेनं. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण केलं होतं. याच मालिकेत सुशांतसोबत प्रमुख भूमिकेत होती ती अभिनेत्री अंकिता लोखंडे. पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते. छोट्या पडद्यावर हिट ठरलेल्या या जोडीच्या अफेअरची मोठी चर्चाही झाली. वाचा- …आणि फोनवरून अंकिता लोखंडेला कळली सुशांतच्या आत्महत्येची बातमी या घटनेमुळं झालं सुशांत-अंकिताचं ब्रेक-अप? 2015मधील एक घटना बरीच चर्चेत होती. असे सांगितले जाते की, नाइट क्लबमध्ये अंकितानं सर्वांसमोर सुशांतच्या कानशिलात लगावली होती. नाइट क्लबमध्ये पार्टी सुरू असतानाच सुशांत आणि अंकितामध्ये वाद झाला. सुशांत नशेत आपल्या फॅन्ससोबत नाचत होता. अंकिताला ते आवडलं नाही. अंकितानं सुशांतला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं ऐकलं नाही, अखेर तिनं सर्वांसमोर सुशांतच्या कानशिलात लगावली. दरम्यान याबाबत कधी सुशांत आणि अंकितानं सांगितले नाही. त्यानंतर सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता. वाचा- सुशांतच्या आत्महत्येआधीचे 12 तास! वाचा नेमकं काय घडलं सुशांतच्या आत्महत्येवर अंकितानं दिली प्रतिक्रीया काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येबाबत अंकितालाही माहिती नव्हती. जेव्हा तिला न्यूज चॅनलमधून फोन आला, तेव्हा तीलं कळलं. सुशांतबाबत ऐकल्यानंतर अंकिता सुन्न झाली. अंकितानं फोन लगेच कट केला. सुशांतच्या आत्महत्येनं अंकिताही प्रचंड दु:खी आणि अस्वस्थ झाली आहे. वाचा- सुशांतसोबतच्या ब्रेकअपवर अंकितानं महिन्याभरापूर्वीच दिली होती प्रतिक्रिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.