मुंबई, 03 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आधारीत अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एका सिनेमाची चर्चा सुरू आहे तो सिनेमा ‘हर हर महादेव’. अभिनेता सुबोध भावे शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजूप्रभू देशपांडेंची तगडी भूमिका साकारताना दिसणार आहे. हर हर महादेव सिनेमातील ‘वाह रे शिवा’ हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे आणि हे गाणं सिनेमाप्रती उत्सुकता आणखी वाढवत आहे. इतके दिवस श्रीवल्ली गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा गायक सिड श्रीराम नं हे गाणं गायलं आहे. गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आगामी ‘हर हर महादेव’ या सिनेमाचं मोशन पोस्टर काही दिवसांआधीच रिलीज करण्यात आलं ज्या मुळे प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्साह वाढला आहे. त्यानंतर आता सिनेमातील ‘वाह रे शिवा’ या गाण्याचा लिरिकल व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. गाण ऐकून अंगावर शहारे येतील इतकं जबरदस्त गाणं सिड श्रीराम यानं गायलं आहे. हेही वाचा - Har Har Mahadev : अजय पुरकर नंतर आता बाजीप्रभू देशपांडे साकारणार ‘हा’ दमदार अभिनेता; तुम्ही ओळखलं का? ‘श्रीवल्ली’ सारख्या हिट गाण्यानंतर भारतीय-अमेरिकन संगीतकार सिड श्रीरामनं वाह रे शिवा गायले आहे. ’ वाह रे शिवा हे गाणं सिड श्रीरामचे पहिले मराठी गाणं असून, या गाण्याचे बोल मंगेश कांगणे यांनी लिहले आहेत आणि हितेश मोडकच्या संगीत संयोजनाने हे गाणं नक्कीच एक थरारक अनुभव देणारं आहे. हे गाणं शंकर महादेवाच्या क्रोधाचे वर्णन करतं.
गायक सिड श्रीरामनं गायलेलं हे त्याचं पहिलं मराठी गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे. सिडच्या मराठीचं देखील सगळेच कौतुक करत आहेत. ‘सिड श्रीराम यांनी ज्याप्रकारे गाण गायलंय यावरून मला ते पुर्णपणे मराठी गायक असल्यासारखेच वाटतात’, अशी प्रतिक्रिया प्रेक्षाकांकडून येत आहे. त्याचप्रमाणे ‘लवकरात लवकर बाकीच्या भाषेतली गाणी सुद्धा ऐकायला मिळोत’, अशी इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.
हर हर महादेव हा सिनेमा केवळ मराठीतच नाही तर हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधूनही एकाच दिवशी भारतभर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तमाम भारतीयांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.