Home /News /entertainment /

विषय हार्ड ! 'पुष्पा' मधील श्रीवल्लीचा नादखुळा मराठी रिमेक पाहिला का?

विषय हार्ड ! 'पुष्पा' मधील श्रीवल्लीचा नादखुळा मराठी रिमेक पाहिला का?

अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदना यांचा पुष्पा द राईज हा चित्रपट सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर सेलेब्सपासून कॉमन मॅन सर्वांनाच वेड लावले आहे. आता या सिनेमातील श्रीवल्लीचा नादखुळा मराठी रिमेका आला आहे.

    मुंबई, 11 जानेवारी - अल्लू अर्जुन  (allu arjun) आणि रश्मीका मंदना यांचा पुष्पा द राईज हा चित्रपट सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर सेलेब्सपासून कॉमन मॅन सर्वांनाच वेड लावले आहे. सामी, हे बिड्डा ये मेरा अड्डा .., श्रीवल्ली या गाण्यावर प्रत्येकजण रील बनवत आहे. आता या गाण्याचा मराठी रिमेक (Srivalli Song From Pushpa Marathi Version ) आला आहे. या मराठी रिमेकला 9 लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं गेले आहे. विजय खंदारे याचे विनोदी व्हिडिओ अनेकांनी युट्युबवर पाहिले असतील. त्यानेच श्रीवल्ली .(Srivalli Song From Pushpa) या गाण्याचा मराठी रिमेक  (srivalli song marathi rimake) बनवला आहे. विजय खंदारे याने या गाण्याला आवज दिला आहे. श्रीनिवास स्टुडिओ अमरावती आणि आदित्य म्युजिक यांनी मिळून हा मराठी व्हर्जन तयार केला आहे. सोशल मीडियावर श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. वाचा-ही मराठी अभिनेत्री आहे राहुल द्रविडची खास; फोटोमुळे झाला नात्याचा उलगड या गाण्यात विजय खंदारेसोबत  (vijay khandare) तृप्ती खंदारे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तिनं या गाण्यात श्रीवल्ली साकारली आहे.या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे त्याने हे गाणं मोबाईवर चित्रीत केले आहे. त्याची आवड म्हणून त्याने हे गाण चित्रीत केले आहे. त्याच्या या मराठी रिमेकला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यामुळे तो स्टार झाला आहे. विजय खंदारे हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातला आहे. त्याचे युट्युब चॅनेल आहे. त्याला अभिनयाची आवड आहे. त्याच्या या चॅनेलवर वऱ्हाडी भाषेचा बाज असलेले अनेक व्हिडिओ त्याने अपलोड केले आहेत. पुष्पा हा सिनेमा तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदीत प्रदर्शित झाला. या सर्वच भाषेत चित्रपटाची गाणी डब करण्यात आलीत. मात्र आता त्याच्या या मराठी रिमेकने सोशल मीडियावर सर्वांना वेड लावले आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या