मुंबई. 21 डिसेंबर-छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारा अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) एकापेक्षा एक निवडक चित्रपटांमध्ये आपल्या जादुई अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. अलीकडेच शरदला अजय देवगणच्या बरोबरच्या तान्हाजी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप दाद दिली. आता भुज: द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj: The Pride Of India) या चित्रपटातील आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत शरदला खूप पसंती मिळाली आहे.
भुज हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. भुज हा चित्रपटही याची अजरामर गाथा आहे. या ऐतिहासिक लढाईबद्दल शरद म्हणतो, “मी खूप भाग्यवान आहे की मला या चित्रपटात आर्मी ऑफिसरची भूमिका करण्याची संधी मिळाली. मला वाटते की, आपल्या संस्कृतीच्या आणि देशाच्या उल्लेखनीय ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनवण्याची गरज आहे. जेणेकरुन तरुणांना हे समजेल की, आपण सर्वांनी उपभोगलेले हे स्वातंत्र्य आपल्या शूर हृदयाच्या अनेक बलिदानानंतर मिळाले आहे. भुज: द प्राईड ऑफ इंडिया सारखे चित्रपट आपल्या स्वतःच्या इतिहासातील जिवंत कथा दर्शवतात.
वाचा-कपिल देव यांना हुबेहूब कॉपी करण्यासाठी रणवीर 6 महिने 4 तास खेळत होता क्रिकेट
शरदने अजय देवगणसोबत सलग तीन चित्रपट करणे ही त्याच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. शरद नेहमी अजयबद्दल सांगतो की, "त्याच्यासोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. त्याच्यासोबत काम करताना घरच्यासारखं वाटतं. अजय सर एक उत्तम अभिनेता आहेत." याशिवाय, तो एक चांगला निर्माता देखील आहे.त्यांची संपूर्ण टीम खूप वेगळी आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही त्यांनी मला आर्मी ऑफिसर आर के नायरची खास भूमिका दिली. मला आशा आहे की, लोक ही ऐतिहासिक कथा त्यांच्या कुटुंबियांसोबत रविवार, 26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर पाहू शकतील.
वाचा-शाहरुख खान ते सलमान खान हे 7 बॉलिवूड कलाकार आहेत गोविंदाचे 'शत्रू'
प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारणारा शरद भुज: द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटात आर्मी ऑफिसर बनला आहे. या अनुभवाबद्दल शरद म्हणला की, "मी नेहमीच गणवेशातील अधिका-यांचा आदर केला आहे, आणि नेहमीच करतो. मी संरक्षण संयुक्त परीक्षा उत्तीर्ण केली होती पण अंतिम मुलाखत देऊ शकलो नाही.कारण नशिबाला काही वेगळेच मंजूर होते. सैन्यात माझे अनेक मित्र आहेत आणि मी नेहमीच त्यांचे अनुकरण करत असतो. या सर्वांमुळेच मी आरके नायरची भूमिका साकारू शकलो, असे देखील शरद केळकर यावेळी म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Bollywood News, Entertainment