मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sharad kelkar: शरद केळकरने दिला सुशांतच्या आठवणींना उजाळा; 'या' कारणासाठी केली शाहरुखशी तुलना

Sharad kelkar: शरद केळकरने दिला सुशांतच्या आठवणींना उजाळा; 'या' कारणासाठी केली शाहरुखशी तुलना

शरद केळकर

शरद केळकर

आपल्या अभिनय आणि भारदस्त आवाजामुळे ओळखल्या जाणाऱ्या शरद केळकर या अभिनेत्याने नुकतंच सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सुशांतच्या आठवणीत शरद केळकर चांगलाच भावुक झालेला दिसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 22 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाही पण आजही सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत लोक त्याच्याविषयी भरभरून बोलतात, त्याची आठवण काढतात. सुशांतचे चाहते आजही दररोज त्याचं  नाव ट्विटरवर ट्रेंडिंग ठेवतात. या अभिनेत्याचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं. आपल्या मेहनतीच्या जोरावर छोट्या पडद्यानंतर बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या कलाकारांपैकी सुशांत एक होता. आपल्या अभिनय आणि भारदस्त आवाजामुळे ओळखल्या जाणाऱ्या शरद केळकर या अभिनेत्याने नुकतंच  सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सुशांतच्या आठवणीत शरद केळकर चांगलाच भावुक झालेला दिसला.

नुकतेच अभिनेते शरद केळकर याने एका मुलाखतीत बोलताना सुशांतच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या.  त्यासोबतच त्याचे जोरदार कौतुक केले आहे. शरद केळकरचा चित्रपटसृष्टीतील प्रवास काहीसा सुशांतप्रमाणेच आहे. त्यानेही छोट्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात करत नंतर चित्रपट सृष्टीत नाव कमावले आहे.त्यामुळेच शरदला सुशांत त्यांच्याप्रमाणेच जवळचा वाटतो. सुशांत सिंगने पहिल्यांदा टीव्हीवरील त्याच्या अभिनयाच्या जोरावर ओळख मिळवली आणि नंतर चित्रपटांमध्येही उत्कृष्ट काम करून एक आदर्श निर्माण केला. आतापर्यंत आपण इंडस्ट्रीत असे दोनच कलाकार पाहिले आहेत ज्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये नाव कमावले आहे. एक तर शाहरुख खाननेही अशा प्रकारे आपले नाव प्रस्थापित केले आहे. त्याचबरोबर सुशांत सिंगनेही शाहरुख खानप्रमाणे मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर प्रगती केली.

हेही वाचा - Shahrukh khan: शाहरुख खानच्या 'मन्नत' बाहेर हिऱ्यांची नेमप्लेट? गौरी खानने सांगितलं सत्य

एका मुलाखतीदरम्यान सुशांतबद्दल बोलताना शरद तो म्हणाला की, ''तो अशा प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होता ज्यांनी टीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवल्यानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीतही त्याने  मोठे स्थान मिळवून एक आदर्श निर्माण केला'' असं तो म्हणाला.

सुशांतचे कौतुक करताना शरद पुढे म्हणाला की,'' इंडस्ट्रीत असे दोनच कलाकार आहेत ज्यांनी आपले काम असे केले आहे. एक, छोट्या पडद्यावर अभिनय केल्यानंतर शाहरुख चित्रपटांकडे वळला. त्याचबरोबर सुशांतनेही आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये प्रगती केली.'' या मुलाखतीत शरदने पुढे सांगितले की, तो सुशांतला खूप आधीपासून ओळखायचा. अभिनेता म्हणाला की, ''जेव्हा तो टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असे तेव्हा त्याचा आणि माझा सेट जवळच होते. आम्ही अनेकदा बराच वेळ बसून बोलायचो. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला माणूसही होता.''

शरद केळकर याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. नुकताच तो हर हर महादेवमध्ये दिसला होता. यापूर्वी तो कोड नेम तिरंगा, ऑपरेशन रोमियो आणि भुजमध्येही दिसला होता. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी चित्रपटातील त्याच्या कामाचेही खूप कौतुक झाले.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Sushant sing rajput, Tv actors