मुंबई, 18 ऑक्टोबर : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाची बातमी 2020 मध्ये आली होती. त्यांच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया आणि तिच्या भावाला तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर तिची सुटकसुद्धा झाली. पण आता रिया चक्रवर्तीने तुरुंगात कसा वेळ घालवला याची माहिती समोर आली आहे. रियाला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याच वेळी, मानवाधिकार वकील आणि कामगार संघटना सुधा भारद्वाज देखील तुरुंगात होत्या. अशा स्थितीत त्यांनी रिया चक्रवर्तीचं तुरुंगात खूप निरीक्षण केलं होतं. सुधा भारद्वाज यांनी आता रियाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
नुकतेच न्यूज लाँड्री या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुधा भारद्वाज त्या काळात रिया चक्रवर्ती तुरुंगात कशी राहिली हे सांगितले. त्या म्हणाल्या, 'सुशांत सिंह राजपूतचा सर्वत्र उल्लेख केला जात होता. प्रसारमाध्यमे सर्वत्र त्याची बातमी होती. काही लोक म्हणायचे की तो वेडा आहे. रियाला बळीचा बकरा बनवला जात आहे, असे आम्ही म्हणायचो. तिला मुख्य बॅरेकमध्ये ठेवण्यात आले नाही याचाही आम्हाला आनंद झाला. तिला विशेष कक्षात राहण्याची व्यवस्था होती.'
हेही वाचा - Deepika Padukone: राजामौलींच्या चित्रपटात झळकणार दीपिका; 'या' सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपले म्हणणे मांडताना त्या म्हणाल्या, 'खर सांगायचे तर रियाला अशा परिस्थितीत आणले गेले. की काय होत आहे हे तिला स्वतःलाही समजू शकत नव्हते. रिया खूप मनमिळाऊ असायची. तुरुंगातून सुटल्यावर तिने सर्व बॅरेकमध्ये मिठाई वाटली. सर्व कैदीही त्याचा निरोप घेण्यासाठी खाली आले. त्यानंतर, प्रत्येकजण रियाला नृत्याची एक झलक दाखवण्याची मागणी करू लागला. त्यानंतर कैद्यांचा आदर राखत तिने सर्वांसोबत नृत्यही केले.'
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणाचा तपास अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आला. ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावालाही तुरुंगवासाची शिक्षा झाली असून तीही काही काळ भायखळा तुरुंगात होती. त्यांनी 28 दिवस तुरुंगात काढले. मात्र, त्यानंतर रिया चक्रवर्ती जामिनावर बाहेर आली आणि अभिनेत्रीलाही या संपूर्ण प्रकरणात मीडिया ट्रायलला सामोरे जावे लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.