मुंबई, 22 नोव्हेंबर : शाहरुख खानचा ‘मन्नत’ हा बंगला अनेकदा चर्चेत असतो. या घरातून शाहरुखच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सुपरस्टारची झलक पाहायला मिळते. किंग खानचा हा बंगला गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नेम प्लेटमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. अलीकडेच किंग खानच्या बंगल्यात काही बदल करण्यात आले आहेत. तेव्हापासून सोशल मीडियावर या बंगल्याची बरीच चर्चा होत आहे. शाहरुखच्या ‘मन्नत’ या घराच्या प्रवेशद्वारावर हिरेजडित नेमप्लेट लावल्याचे बोलले जात आहे. या नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. लोक या हिऱ्यांच्या नेमप्लेट वे आश्चर्य व्यक्त करत असताना आता शाहरुखच्या प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर पत्नी गौरी खानने याविषयी खुलासा केला आहे. मुंबईत आल्यावर पर्यटक हमखास शाहरुख खानचा बंगला पाहायला येतात. शाहरुखचे चाहते बंगल्याबाहेर उभे राहून त्यांचे फोटो क्लिक करतात. शाहरुख किती मोठा स्टार आहे, याचा अंदाज त्यावरून येतो. आता त्याच्या घराच्या नेम प्लेटचीही सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्याच्या नावाची पाटी हिऱ्यानी जडलेली असल्याचे बोलले जात आहे. आता शाहरुखची पत्नी गौरी खानने स्वतः या नेम प्लेटचे सत्य सांगितले आहे. अलीकडेच गौरीने या नेम प्लेटजवळचा एक फोटो क्लिक केला आणि तो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. हेही वाचा - रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप उरकलं लग्न? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण अलीकडेच गौरी खानने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा एक नवीन फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती मन्नतच्या घराबाहेर पोज देताना दिसत आहे. या फोटोतील गौरीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने व्हाइट टॉप आणि ब्लू डेनिम ब्लॅक ब्लेझर घातलेला दिसत आहे. फोटो नीट बघितला तर ती त्याच नेम प्लेटवर उभी आहे, जी काही काळापासून चर्चेत होती. तिचा फोटो शेअर करण्यासोबतच गौरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक घराचा मुख्य दरवाजा हा तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा प्रवेश बिंदू असतो. म्हणूनच नेम प्लेट घरात सकारात्मक ऊर्जा आणते. आम्ही काचेच्या क्रिस्टल्ससह (नेम प्लेटसाठी) पारदर्शक साहित्यापासून नेमप्लेट तयार केली आहे, जी सकारात्मक ऊर्जा घरात आणते आणि मन शांत करते. #GauriKhanDesigns.’ असे तिने म्हटले आहे.
या पोस्टमधून गौरीने शाहरुख खानच्या दाराबाहेर असलेली नेमप्लेट हिऱ्याची असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. गौरी स्वत: एक इंटिरियर डिझायनर आहे आणि तिच्या पोस्टमध्ये वापरण्यात आलेला हॅशटॅग तिने स्वतःच नेमप्लेट डिझाइन केल्याचे सांगत आहे.
शाहरुख खानची बायको गौरी खान एक डिझायनर असण्यासोबतच गौरी शाहरुखचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट देखील पाहते. ही कंपनी शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मात्र त्याआधी शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटातूनदमदार कमबॅक करणार आहे. आता त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी ठरतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.