मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तान्हाजी' नंतर शरद केळकर आणि अजय देवगण पुन्हा झळकणार एकत्र?; अभिनेत्यानेच दिली हिंट

'तान्हाजी' नंतर शरद केळकर आणि अजय देवगण पुन्हा झळकणार एकत्र?; अभिनेत्यानेच दिली हिंट

 शरद केळकर आणि अजय देवगण

शरद केळकर आणि अजय देवगण

तान्हाजी चित्रपटात शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचं विशेष कौतुक झालं. अजय देवगण आणि शरद केळकर हे समीकरण प्रेक्षकांना पसंत पडलं. आता हे दोघे पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा समोर येत आहेत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 21 ऑक्टोबर : हिंदी सिनेविश्वात उत्तम कामगिरी करणारा अभिनेता म्हणजेच  शरद केळकर.  त्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'बाहुबली' चित्रपटामध्ये प्रभासला दिलेल्या आवाजामुळे त्याला एक नवीन ओळख मिळाली. त्याने तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचं  विशेष कौतुक झालं. अजय देवगण आणि  शरद केळकर हे समीकरण प्रेक्षकांना पसंत पडलं. आता हे दोघे पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा समोर येत आहेत. बॉलीवूड अभिनेता शरद केळकरने नुकतंच त्याच्या आगामी प्रोजेक्टचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये तो पुन्हा एकदा अजय देवगणसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. याआधी शरदने अजय देवगणसोबत 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया', 'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'बादशाहो' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता अजयसोबत चौथ्यांदा काम करण्यास उत्सुक असल्याचे शरदनी  सांगितलं आहे.

शरद केळकर सध्या ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्याचा आगामी चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बहुआयामी अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तेव्हापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

हेही वाचा - Diwali 2022 : आलिया-रणबीरपासून कतरिना-विकीपर्यंत 'हे' कलाकार साजरी करणार लग्नानंतरची पहिली दिवाळी

पिंकविलाशी बोलताना शरद म्हणाला, अजयच्या आगामी चित्रपट भोलाचा तो एक भाग असेल असे त्याला वाटत असले तरी तो चित्रपटात दिसणार नाही. रिपोर्टनुसार, शरद म्हणाला, अजयने मला फोन केला नाही. त्यामुळे शरद आणि अजय खरंच  एकत्र काम करणार का याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इतर रिपोर्टनुसार, शरदने देवगणसोबतच्या एका नवीन प्रकल्पाची पुष्टी केली आणि सांगितले, “आम्ही काही योजना करत आहोत. एक चित्रपट येणार होता  पण मला सगळं जुळून आलं नाही. पण आम्ही त्यावर काम करत आहोत. मला वाटते की पुढच्या वर्षी आपण त्यावर काम करू. अजय सोबत काम करणं हा खूप मजेदार अनुभव असतो. त्यामुळे आम्ही नक्कीच काहीतरी छान प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.'' संभाषणात शरदने या प्रकल्पाचे नाव सांगितले नाही पण आगामी काळात तो अजयसोबत पुन्हा स्क्रीन शेअर करणार असल्याचे संकेत दिले.

शरद केळकर सध्या  ‘हर हर महादेव’ चित्रपटात झळकणार आहेच त्यासोबतच ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमाच्या हिंदी आवृत्तीसाठी तो प्रभासला पुन्हा एकदा आवाज देतोय.  त्यामुळे एकीकडे तो  बाजीप्रभूंची भूमिका आणि दुसरीकडे 'आदिपुरुष' सिनेमात श्रीराम या भूमिकेला आवाज अश्या दुहेरी भूमिका साकारत आहे. हा योग सुखावणारा आहे, कलाकार म्हणून मला विविधांगी काम करायला मिळतंय याचं समाधान आहे. अशा भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. आता त्याला आणि अजयला एकत्र पाहणं  ही  प्रेक्षकांसाठी उत्तम पर्वणी असेल.

First published:

Tags: Ajay devgan, Bollywood actor, Entertainment