मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shahrukh Khan: बॉलीवूडचा बादशाह झाल्यानंतरही अपूर्ण होती एक इच्छा; अखेर 30 वर्षांनी होणार पूर्ण

Shahrukh Khan: बॉलीवूडचा बादशाह झाल्यानंतरही अपूर्ण होती एक इच्छा; अखेर 30 वर्षांनी होणार पूर्ण

शाहरुख खान

शाहरुख खान

शाहरुखने आपल्या 30 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अजूनही एक इच्छा अपूर्ण असल्याचा खुलासा केला होता. पण आता शाहरुख मात्र त्याची अधुरी इच्छा पूर्ण करणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 डिसेंबर :  शाहरुख खान हा एकमेव बॉलीवूड स्टार आहे जो कधी त्याच्या चित्रपटांसाठी तर कधी त्याच्या लूकमुळे चर्चेत राहतो. सध्या तो त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपट आणि गाण्यांबद्दल बरेच वाद आहेत. त्याच्या 'पठाण' चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून सगळीकडे गदारोळ माजला होता. आता मात्र या वादामुळे शाहरुखच्या चित्रपटातील दोन्ही गाण्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनाही पसंती दिली जात आहे. पण यादरम्यान शाहरुखने आपल्या 30 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अजूनही एक इच्छा अपूर्ण असल्याचा खुलासा केला होता. पण आता शाहरुख मात्र त्याची अधुरी इच्छा पूर्ण करणार आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे स्वप्न 'पठाण' या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि यशराज फिल्म्स यांचे जुने नाते आहे. शाहरुखचा चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हे त्याचे या प्रॉडक्शनशी इतकी वर्षे जोडले जाण्याचे प्रमुख कारण आहे. शाहरुखने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला की, त्याला रोमान्सचा बादशाह बनवण्यात त्याच्या चित्रपटाचा मोठा हात होता. अभिनेत्याने सांगितले होते की, याआधी तो एका अॅक्शन चित्रपटात काम करणार आहे, ज्यावर आदित्य चोप्रानेही काम सुरू केले होते, मात्र अचानक 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा रोमँटिक चित्रपट तयार झाला.

हेही वाचा - आलिया भट्ट ते अक्षय कुमार हे स्टार्स काही मिनिटांच्या भूमिकेसाठी आकारतात करोडोंची फी

करिअरच्या सुरुवातीला शाहरुखला अॅक्शनपट करायचे होते. पण 90 च्या दशकात यशराज बॅनरने त्याला संपर्क केला आणि सांगितले की मला एका चित्रपटात काम करायचे आहे. त्या दिवसांत शाहरुखचे करिअर सुरू होते. तो म्हणाला, 'मी आणि आदित्य एका अॅक्शन फिल्मबद्दल बोललो होतो. पण एक दिवस अचानक तो माझ्याकडे आला आणि म्हणाला ऍक्शन सोडा माझ्याकडे एक रोमँटिक चित्रपट आहे.' मग काय, यानंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट तयार झाला ज्याने एक वेगळा इतिहास रचला.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आता यशराज बॅनरखाली बनलेल्या 'पठाण' या अॅक्शनपटामुळे शाहरुख खानचे 30 वर्षे जुने स्वप्न पूर्ण होणार आहे. शाहरुखचा हा चित्रपट 25 जानेवारी 2023 ला रिलीज होणार आहे. ज्यामध्ये शाहरुख अॅक्शन करताना दिसणार आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र शाहरुखचा हा चित्रपट सध्या वादात सापडला असून, या चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता चित्रपट तरणार कि बुडणार हे येणाऱ्या काळातच कळेल.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Entertainment, Shahrukh khan