मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Pathaan: 'पठाण'च्या OTT रिलीजपूर्वी चित्रपटाच्या 'त्या' गोष्टींमध्ये करावा लागणार बदल, हायकोर्टाने दिला आदेश; काय आहे कारण?

Pathaan: 'पठाण'च्या OTT रिलीजपूर्वी चित्रपटाच्या 'त्या' गोष्टींमध्ये करावा लागणार बदल, हायकोर्टाने दिला आदेश; काय आहे कारण?

शाहरुख खान

शाहरुख खान

बॉलिवूड किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खान गेल्या चार वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे. आता अभिनेता बहुचर्चित 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 17 जानेवारी-  बॉलिवूड किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खान गेल्या चार वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे. आता अभिनेता बहुचर्चित 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. तसेच हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या गाण्यावरुन हा वाद निर्माण झाला होता. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या या चित्रपटात आणखी काही बदल करण्यास सांगितले आहे. दृष्टिहीन प्रेक्षकांनाही या चित्रपटाचा आनंद घेता यावा यासाठी न्यायालयाने चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत काही सूचना दिल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने 'पठाण'च्या ओटीटी रिलीजसाठी हिंदी भाषेत काही बदल सुचविले आहेत.

'पठाण' या आगामी चित्रपटात आवश्यक बदल केल्यानंतर, उच्च न्यायालयाने निर्मात्यांना हा चित्रपट पुन्हा प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीकडे सादर करण्याचा आदेश दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र ही मार्गदर्शक तत्त्वे पठाणच्या थिएटर रिलीजसाठी नसून फक्त ओटीटी रिलीजसाठी आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने प्रोडक्शन हाऊसला चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी काही नवीन गोष्टी जोडण्यास सांगितल्याआहेत.

(हे वाचा: Shahrukh Khan: विदेशात शाहरुखचा डंका; बुर्ज खलिफावर झळकला 'पठाण'चा ट्रेलर; अभिनेत्याच्या सिग्नेचर स्टेपने लावलं वेड)

दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसनंतर, 'पठाण' च्या निर्मात्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल आणि 'पठाण'ला सीबीएफसीकडे ओटीटी रिलीज होण्यापूर्वी पुन्हा प्रमाणपत्रासाठी पाठवण्यापूर्वी आवश्यक त्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या 'पठाण' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजपूर्वी हिंदी भाषेत ऑडिओ वर्णन, क्लोज कॅप्शनिंग आणि उप-शीर्षके तयार करण्यास सांगितले आहेत.त्यामुळे पठाणसमोरील आव्हाने आणखीनच वाढली आहेत.

बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरत असलेला 'पठाण' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियादेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी टीझर रिलीज केल्यापासून पठाण चर्चेत आला आहे. दरम्यान काही लोकांनी 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर आक्षेप घेतला होता.

तसेच सीबीएफसीने निर्मात्यांना चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे. 'पठाण' एप्रिलमध्ये OTT वर प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने, ते सर्व बदल शक्य आहेत जे उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला करण्यास सांगितले आहेत. पठाणला रिलीजपूर्वी आणि नंतर आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो असंच दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Deepika padukone, Entertainment, Shahrukh khan