जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ved Box Office Collection: रितेशच्या 'वेड' नं गाठला 50 कोटींचा टप्पा; अभिनेता म्हणाला 'शब्द अपुरे...'

Ved Box Office Collection: रितेशच्या 'वेड' नं गाठला 50 कोटींचा टप्पा; अभिनेता म्हणाला 'शब्द अपुरे...'

वेड

वेड

‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले असले तरी प्रेक्षक मात्र चित्रपटाला अजूनही भरघोस प्रतिसाद देत आहेत. आता ‘वेड’ने मोठा टप्पा गाठला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 जानेवारी: रितेश आणि जिनिलियाच्या ‘ वेड ’ चित्रपटाचीच सगळीकडे हवा आहे.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटापुढे  बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचीही अवस्था वाईट झाली आहे. भलेभले बिग बजेट सिनेमे सध्या फ्लॉप होत असून रितेश आणि जिनिलियाची जोडी मात्र हिट झाली आहे. सध्या सगळीकडे रितेशचं कौतुक होत आहे. मध्यंतरी रितेशने चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली होती. या चित्रपटानंतर सत्या आणि श्रावणीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले असले तरी प्रेक्षक मात्र चित्रपटाला अजूनही भरघोस प्रतिसाद देत आहेत. आता ‘वेड’ने मोठा टप्पा गाठला आहे. रितेश आणि जिनिलिया या मराठमोळ्या जोडीला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल 20.18 कोटींची कमाई करत सर्वांनाच थक्क केलं होतं. तर दुसऱ्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली आहे. नव्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या 18 व्या दिवशी 1.4कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाने एकूण तब्बल 50कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. हेही वाचा - Ved Movie: ‘वेड’ चित्रपटात होणार ‘हा’ बदल; लाईव्ह येत रितेश देशमुखचा मोठा खुलासा याविषयी सांगताना रितेशने नुकतीच एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रेक्षकांचे आभार मानत त्याने म्हटलंय कि, ‘शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!’

जाहिरात

वेडचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असंच सुरु राहिलं तर हा चित्रपटसुद्धा सैराटला टक्कर देणारा ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवलं होतं. शंभर कोटींमध्ये प्रवेश करणारा हा पहिला सिनेमा होता. आता वेड हा रेकॉर्ड मोडीत काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, उद्यापासून म्हणजेच 20 जानेवारीपासून वेड एका नव्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘वेड’ मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.  रितेशने एका नव्या गाण्यासोबतच सत्या आणि श्रावणीचे रोमँटिक क्षण आता सिनेमात पाहायला मिळतील असं सांगितलं आहे. त्याचसोबत सलमान खान असलेलं ‘वेड लावलंय’ हे गाणं आधी चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलं होतं. आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हे गाणं  चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता उद्यापासून चित्रपटाला अजून जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात