मुंबई, 11 जानेवारी : बिग बॉस मराठी च्या चौथ्या सीझनन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर ठरला. अक्षयनंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने रनरअप ठरले. बिग बॉसमध्ये पहिल्या दिवसांपासून किरण माने चांगलेच चर्चेत होते. किरण माने यांची बाहेर चांगलीच फॅन फॉलोविंग होती. त्यांना मानणारा एक चाहता वर्ग असल्यानं किरण माने शेवटपर्यंत बाजी मारतील अशी अपेक्षा सर्वांन होती. ते ट्रॉफीचे मानकरी ठरतील असं सर्वांना वाटलं होतं मात्र किरण माने तिसऱ्या क्रमांकावर घराबाहेर आले. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर किरण माने त्यांच्या घरी साताऱ्याला पोहोचले. साताऱ्यांत मानेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. दरम्यान बिग बॉसविषयी बोलताना किरण मानेंनी आधीच्या वादाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. किरण माने यांना सातारकरांनी प्रचंड प्रेम दिल. साताऱ्यात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. हजारो लोक किरण माने यांना भेटण्यासाठी आले होते. अनेकांनी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत किरण माने म्हणाले, बिग बॉसच्या घरात 100 दिवस राहणं सोपं नव्हतं. बिग बॉस स्क्रिप्टेड आहे असं म्हटलं जात पण तसं नाहीये. बिग बॉसमध्ये तुमची शारीरिक, बौद्धिक सहनशीलता तपासली जाते. माझ्यापेक्षा निम्म्या वयाची मुलं आत होती त्यांच्याबरोबर चॅलेंज करणं सोपं नव्हतं. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: एरवी राखीच्या मागेपुढे करणाऱ्या किरण मानेंनी बायकोला समोर पाहताच दिली ही रिऍक्शन किरण माने पुढे म्हणाले, ‘माझ्या कुटुंबापासून दूर राहणं मी अनुभवत होतो. त्यामुळे सुरूवातीच्या काळात मी शांत होतो. मला बंधनात राहायला आवडत नाही. त्यामुळे माझी घुसमट झाली. गेल्या वर्षी 13 जानेवारीला मुलगी झाली हो मालिका माझ्याकडून अन्यायकारकरित्या हिरावून घेतली. माझी चुकीच्या पद्धतीनं बदनामी करण्यात आली. पुढचे सहा महिने माझ्यासाठी खूप वाईट होते. मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती’.
‘13 जानेवारीचा तो दिवस आणि आज जानेवारी महिन्यात तुम्हीच माझी बिग बॉसच्या निमित्तानं हसत खेळत मुलाखत घेत आहात. म्हणजे याचाच अर्थ मी त्या गोष्टींवर मात केली आहे’, असं शेवटी किरण माने म्हणाले.
किरण माने बिग बॉस जिंकलीत अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर घराबाहेर पडावं लागल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. किरण माने बिग बॉस जिंकू शकले नसले तरी ते प्रेक्षकांनी मनं जिंकण्यात मात्र यशस्वी ठरले आहेत असं त्यांच्या सध्याच्या फॅन फॉलोविंगवरून लक्षात येत आहे.