बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अखेर आज संपणार आहे. आज बिग बॉसच्या या सीजनचा शेवटचा दिवस आहे. आजच बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यासाठी स्पर्धकांसोबतच प्रेक्षकसुद्धा प्रचंड उत्सुक आहेत. या सीजनचा विजेता कोण बनणार? बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हातात येणार हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. पण आज शंभराव्या दिवशी घराचा निरोप घेताना अपूर्वा मात्र भावुक झाली आहे.