मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बेस्ट फ्रेंडमुळे गमावला बॉयफ्रेंड, मग कतरिनाच्या आयुष्यात झाली रिअल हिरो विकीची एंट्री

बेस्ट फ्रेंडमुळे गमावला बॉयफ्रेंड, मग कतरिनाच्या आयुष्यात झाली रिअल हिरो विकीची एंट्री

रिअल हिरोची एंट्री कतरिनाच्या आयुष्यात होण्यापूर्वी कतरिना रणबीर कपूरला डेट करत होती हे जगजाहीर आहे. मात्र रणबीरसोबत ब्रेकअप होण्याचे कारण तिची जवळची मैत्रीण बॉलिवूड अभिनेत्री ठरल्याचे बोलले जाते.

रिअल हिरोची एंट्री कतरिनाच्या आयुष्यात होण्यापूर्वी कतरिना रणबीर कपूरला डेट करत होती हे जगजाहीर आहे. मात्र रणबीरसोबत ब्रेकअप होण्याचे कारण तिची जवळची मैत्रीण बॉलिवूड अभिनेत्री ठरल्याचे बोलले जाते.

रिअल हिरोची एंट्री कतरिनाच्या आयुष्यात होण्यापूर्वी कतरिना रणबीर कपूरला डेट करत होती हे जगजाहीर आहे. मात्र रणबीरसोबत ब्रेकअप होण्याचे कारण तिची जवळची मैत्रीण बॉलिवूड अभिनेत्री ठरल्याचे बोलले जाते.

मुंबई, 6 डिसेंबर : सगळीकडे चर्चा आहे ती फक्त आणि फक्त कतरिना कैफ आणि विकी कौशल  (Vicky Kaushal Katrina Kaif Destination Wedding). यांच्या लग्नाची. मात्र या रिअल हिरोची एंट्री कतरिनाच्या आयुष्यात होण्यापूर्वी कतरिना रणबीर कपूरला डेट करत होती हे जगजाहीर आहे. मात्र रणबीरसोबत ब्रेकअप होण्याचे कारण तिची जवळची मैत्रीण बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ठरल्याचे बोलले जाते. मात्र कतरिना यावर आजपर्यंत काहीच बोलेली नाही.

कतरिना आणि आलियाच्या मैत्रीची चर्चा

एक काळ असा होता की बॉलिवूड वर्तुळात कतरिना आणि आलियाच्या मैत्रीची चर्चा होती. दोघी अनेकदा एकत्र स्पॉट झाल्या आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असत. पण आलियाने रणबीर कपूरला डेट करायला सुरुवात केली तेव्हा कतरिना आणि आलिया यांच्यातील मतभेदाची बातमी समोर आली. तर आलियापूर्वी रणबीर कतरिनाला डेट करत होता. दोघ लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण नंतर 2016 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. रणबीरच्या आयुष्यात आलियाची एंट्री झाल्याने कतरिना आणि रणबीरते नाते तुटल्याचे बोलले जाते. यानंतर या दोघी कधी एकत्र दिसल्या नाहीत. शिवाय त्यांनी यावर काही भाष्य देखील केले नाही.

वाचा : एक खास ब्लाऊज घालून लग्नाआधी Vicky Kaushal च्या घरी गेली Katrina Kaif; साडीची किंमत वाचून तर चक्करच येईल

ब्रेकअपनंतर कतरिनाने डिप्रेशनचा सामना केला

या ब्रेकअपनंतर कतरिनाने डिप्रेशनचा सामना केला होता. सोशल मीडिया पोस्ट करत कतरिनाने याचा खुलासा केला होता. यावेळी रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंज दीपिका पादुकोण हिने कतरिनाला यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली होती. दीपिकाचे आणि रणबीरचे ब्रेकअप देखील कतरिनामुळे झाल्याची चर्चा होती. यावेळी देखील दीपिकाने डिप्रेशनचा सामाना करावा लागला होता. मात्र यावेळी दीपिकाने मैत्रिचा हात पुढे करत कतरिनाला मदत केली. यावेळी कतरिनाला या सगळ्यात बाहेर काढण्यासाठी तिचा जवळचा मित्र सलमान खानने देखील मदत केल्याची चर्चा होती.

वाचा : विकी-कतरिनाच्या लग्नासाठी सजणार शाही मांडव; 7 घोड्यांच्या रथावरुन होणार अभिनेत्याची एण्ट्री, वाचा डिटेल्स

अशी आहे विकी आणि कतरिनाची लव्हस्टोरी

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना सिंगल होती. अशात विकी तिच्या आयुष्यात आला आणि बघता बघता दोघेही एकमेकांत गुंतले.2018 मध्ये ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये काऊचवर कतरिना बसली होती. नेहमीप्रमाणे करणने कतिरिनाला प्रश्न केला होता. तुझ्यासोबत कोणत्या हिरोची जोडी परफेक्ट दिसेन? असा तो प्रश्न होता. यावर कतरिनाने विकी कौशल असे उत्तर दिले होते.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

यानंतरच्या ‘कॉफी विद करण’च्या एपिसोडमध्ये विकी व आयुष्यमान खुराणा सहभागी झाले होते. यावेळी करणने अगदी आठवणीने कतरिनाची ही गोष्ट विकीला सांगितली होती. मी आनंदाने बेशुद्ध पडेन, असे ही गोष्ट ऐकल्यानंतर विकी म्हणाला होता. ‘कॉफी विद करण’च्या या एपिसोडनंतर जवळजवळ वर्षभरानंतर खरोखर विकी व कतरिना सोबत दिसू लागले होते. 2019 मध्ये एका अवार्ड फंक्शनमध्ये विकी कौशलने सलमान खानसमोर कॅटला प्रपोज केले होते. सलमानची त्यावरची रिअ‍ॅक्शन त्यावेळी बघण्यासारखी होती. अर्थात हे प्रपोजल गमतीचा एक भाग होता. पण यानंतर कॅट व विकीची मैत्री ख-या अर्थाने वाढली होती. पुढे मैत्री झाली, तसे प्रेम झाले. आता दोघे आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Salman khan, Vicky kaushal