Home /News /entertainment /

विकी-कतरिनाच्या लग्नासाठी सजणार शाही मांडव; 7 घोड्यांच्या रथावरुन होणार अभिनेत्याची एण्ट्री, वाचा डिटेल्स

विकी-कतरिनाच्या लग्नासाठी सजणार शाही मांडव; 7 घोड्यांच्या रथावरुन होणार अभिनेत्याची एण्ट्री, वाचा डिटेल्स

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: हे डेस्टिनेशन वेडिंग 7 ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान राजस्थानात होणार असून त्यामध्ये संगीत, मेहंदी असे सगळे विधी होणार आहेत.

नवी दिल्ली 06 डिसेंबर : बॉलिवूडमधलं लग्न (Celebrity Weddings) हे कायम चर्चेत असतं. अभिनेता-अभिनेत्रीचं असो किंवा खेळाडू आणि कलाकारांचं असो त्याबाबत चाहत्यांना प्रचंड कुतूहल असतं. सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली आहे ती विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची (Vicky Kaushal Katrina Kaif Destination Wedding). या लग्नाची खूप जोरदार तयारी सुरू आहे. या दोघांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे डेस्टिनेशन वेडिंग 7 ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान राजस्थानात होणार असून त्यामध्ये संगीत, मेहंदी असे सगळे विधी होणार आहेत. सवाई माधोपूरमध्ये हे लग्न होणार आहे. त्यामुळे तिथं देशविदेशातील सेलिब्रिटी येणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. सवाई माधोपूरचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट राजेंद्र किशन यांनी विकी-कतरिनाच्या सेलिब्रिटी लग्नासाठी येणाऱ्या आदरणीय व्यक्तींमुळे सामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून कायदा सुव्यवस्था व वाहतूक व्यवस्था नीट ठेवण्यासंबंधी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. तसंच कोविडचा काळ लक्षात घेऊन या लग्नाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ना याची खातरजमा करून घेण्याचे आदेशही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या लग्नाबद्दलची ताजी बातमी अशी आहे की विकी एक मोठ्ठी वरात घेऊन येणार आहे. यावेळी तो पारंपरिक पद्धतीने घोड्यावर बसून येणार आहे, त्यासाठी 7 पांढऱ्या रंगाचे घोडे निवडण्यात आले असून नवरदेव विकी एका घोड्यावर नाही तर सात घोड्यांच्या रथावर बसून येणार आहे. आणखीही महत्त्वाचं म्हणजे विशेष करून नवरीसाठी शाही मांडव डिझाइन करण्यात आला आहे. विकी आणि कतरिनाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंच्या संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमांना आधीपासूनच सुरूवात झाली आहे. 7 ते 9 डिसेंबरदरम्यान राजस्थानातील सवाई माधोपूरमध्ये होणाऱ्या या ग्रँड विवाह सोहळ्याला विकी आणि कतरिनाच्या नातेवाईक, मित्रांसोबतच पाहुण्यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. हे लग्न थोडं खासगी स्वरूपाचं असल्याने त्यात फक्त जवळचे नातेवाईक आणि काही पाहुणेच उपस्थित राहणार आहेत. वधू आणि वर दोघंही नंतर फिल्म इंडस्ट्रीतल्या आपल्या मित्रांसाठी रिसेप्शन ठेवणार आहेत. ज्यात बॉलिवूडमधले स्टार्स हजेरी लावतील. सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा इथं हे लग्न होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कतरिना आणि विकी यांचे नातेवाई त्यांच्या घरी पोहोचत आहेत. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान विविध विधी होणार आहेत. त्यामुळे हे सगळे जण 7 डिसेंबरला विवाहस्थळी पोहोचतील. 9 डिसेंबरला अग्निला साक्षी मानून वधूवर सात फेरे करतील असं सूत्रांनी सांगितलं आहे. दोघांचे आई-वडील सध्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. समजलेल्या माहितीनुसार 6 डिसेंबरला ही जोडी जयपूरमध्ये येणार असून लग्नाच्या ठिकाणी हे दोघं हेलिकॉप्टरने येणार आहेत. या लग्नाबद्दल माध्यमांना माहिती दिली जात नाहीये. लग्नात सहभागी होणाऱ्यांना मोबाईल लग्नस्थळी नेता येणार नाही तसंच विशेष कोड असलेल्या व्यक्तीलाच त्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
First published:

Tags: Katrina kaif, Vicky kaushal, Wedding

पुढील बातम्या