Home /News /entertainment /

एक खास ब्लाऊज घालून लग्नाआधी Vicky Kaushal च्या घरी गेली Katrina Kaif; साडीची किंमत वाचून तर चक्करच येईल

एक खास ब्लाऊज घालून लग्नाआधी Vicky Kaushal च्या घरी गेली Katrina Kaif; साडीची किंमत वाचून तर चक्करच येईल

फोटो सौजन्य - विरल भयानी

फोटो सौजन्य - विरल भयानी

लग्नाआधी कतरिना कैफ (Katrina kaif) विकी कौशलच्या (Vicky kaushal) मुंबईतल्या घरी डिनरसाठी पोहोचली.

मुंबई, 06 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. दोघेही लवकरत लग्नबंधनात अडकणार असल्याचं वृत्त आहे (Katrina Kaif Vicky Kaushal wedding) . त्यांनी दोघांनीही याबद्दल काहीही अधिकृत सांगितलेलं नसलं, तरी दोघांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूरमधल्या सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये होणार असल्याचं कळतं. त्यांचा शाही विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. विकी आणि कतरीनाच्या या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतीच कतरीना आपल्या होणाऱ्या सासरी म्हणजेच विकी कौशलच्या घरी गेल्याचं पापाराझींनी टिपलं. कतरीनाने त्या वेळी आयव्हरी जॉर्जेट रफल साडी परिधान केली होती. त्याबद्दलची चर्चा रंगली आहे. याबाबतचं वृत्त लाइव्ह हिंदुस्तानने दिलं आहे. विकी कौशलच्या मुंबईतल्या घरी लग्नाच्या विधींना (Vicky-Katrina Wedding) सुरुवात झाली आहे. विकीच्या घरी डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी कतरीना आपल्या कुटुंबासह रविवारी (5 डिसेंबर) विकी कौशलच्या घरी पोहोचली होती. आपल्या होणाऱ्या सासरी जाताना कतरीना पांढऱ्या रंगाची रफलची साडी नेसली होती. विकी आणि कतरीनाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासून पापाराझी तिच्या मागेच असून, तीचा सुंदर हटके लूक पापाराझींनी आपल्या कॅमऱ्यात टिपला. त्या वेळी कतरीनाने त्यांच्याकडे पाहूनही हात हलवून स्मितहास्यही केलं. हे वाचा - विकी-कतरिनाच्या लग्नासाठी सजणार शाही मांडव; रथावर होणार एण्ट्री, वाचा डिटेल्स कतरीनाचा हा देसी लूक चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे.  लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार कतरीनाने नेसलेल्या पांढऱ्या रंगाच्या साडीची किंमत तब्बल 54 हजार रुपये आहे. अर्पिता मेहताने ही साडी डिझाइन केली होती. या साडीवरच्या ब्लाउजनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तुम्ही हा ब्लाऊज नीट पाहाल तर त्यावर कवडी लावण्यात आलेल्या आहेत.
विकी आणि कतरीनाचा विवाह सोहळा सलग तीन दिवस चालणार आहे. सिक्स सेन्सेस या रिसॉर्टमध्येच लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पडणार असून, विकी आणि कतरीना 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. यासाठी कतरीना आणि तिचे कुटुंबीय राजस्थानला रवाना होत आहेत. शाही विवाहसोहळ्यासाठी रिसॉर्टमध्ये कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. लग्नाचे कोणतेही फोटोज व्हायरल होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येत आहे. हे वाचा - video :मलायका चालवत होती सायकल अन् अर्जुन कपूरने गुपचूप केलं हे काम कतरिना आणि विकीचं लग्न हे 2021मधलं सर्वांत मोठं लग्न मानलं जात आहे. या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी येणार आहेत. या विवाहसोहळ्याबाबत गुप्तता पाळली जात असून, अद्याप या दोघांकडून लग्नाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विकी आणि कतरीना लोकप्रिय असून, त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरू असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नेटकरी लक्ष ठेवून आहेत.
First published:

Tags: Actress, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

पुढील बातम्या