मुंबई, 26 डिसेंबर : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिग बॉसमध्ये बंद घरात असलेल्या सेलिब्रेटींची पोलखोल करत असतो. सलमान अनेक वर्ष बिग बॉस होस्ट करतोय. यात त्यानं अनेकवेळा अनेकांचे खुलासे केलेत. बॉलिवूडचा भाईजान आज 27 सप्टेंबरला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. इतरांची पोलखोल करणाऱ्या सलमानच्या रंजक गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतील. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमानचा आजवरचा प्रवास तसा खडतर होता. आई वडील अभियन क्षेत्रातील असूनही सलमाननं स्ट्रगल केला. सलमाननं वडिलांचा महिन्याचा संपूर्ण पगार जाळला होता. इतकंच नाही तर एका वेळेस भाईजान 30-35 चपात्यांवर ताव मारायचा. हे सगळं तो का करायचं जाणून घ्या.
आधी सलमान खाननं वडिलांचे पैसे जाळले अशा चर्चा होत्या. त्यानंतर त्या अफवा असल्याचं समोर आलं मात्र या अफवांवर एकदा सलमान खानचं मौन सोडलं होतं. सलमानंन म्हटलं, या अफवा नाहीत पण यातील काही गोष्टी फिरवून सांगितल्या गेल्यात. सलमाननं म्हटलं, 'एके दिवशी दुपारी असं झालं की मी बास्केटमध्ये काही जाळत होतो. तेव्हा मी 6-7 वर्षांचा होतो. त्या आगीत आणखी काही टाकण्यासाठी मी काही शोधत होतो. तेव्हा मी पाहिलं की माझे वडील काही पेपर एका ठिकाणी टाकत होते. मी त्यातील काही पेपर घेतले आणि जाळून टाकले. नंतर मला कळलं की मी त्या पेपरबरोबर जवळपास सातशे रुपये देखील जाळून खाक केले होते'.
हेही वाचा - सलमान खानच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीला वारस कोण? अभिनेत्याने स्वत:च दिलं उत्तर
तेव्हा सलमानच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. इंदौरहून त्याचे वडील 60 रुपये घेऊन मुंबईत आले होते. सलमान पुढे म्हणाला, 'या घटनेनंतर आई मला खूप ओरडली होती. पण वडीलांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. ते आईला म्हणाले, तो अजून लहान आहे, त्याला कुठे माहिती आहे की ते पैसे आहेत. त्या महिन्यात आईला घर चालवणं खूप कठीण गेलं होतं. मग ही गोष्ट आमच्या शेजाऱ्यांना कळली. त्यांची आणि आमची परिस्थिती सारखीच होती. त्यांनी आम्हाला मदत केली. त्याच्या मदतीनं आम्ही कसा बसा महिना काढला'.
View this post on Instagram
इतकंच नाही तर सलमान खान साजन सिनेमावेळी एका वेळेस जवळपास 30-35 चपात्या खात होता असंही म्हटलं गेलं होतं. यावरही सलमान खानला विचारलं गेलं असता तो म्हणाला होता की, 'हो 'साजन' सिनेमावेळी मी असं करत होतो. तेव्हा मी खूप बारीक होतो. वजन वाढवण्यासाठी मी खूप खायचो. पण आज एका दिवसाचं जेवण मी एक आठवडाही खात नाही'.
सलमान पुढे म्हणाला, 'वजन वाढवण्यासाठी 30-30 चपात्या, राजमा आणि त्यानंतर भात खायचो. माहिती नाही खाल्लेल सगळं कुठे जायचं. आजकाल एक चपाती खायलाही जास्त होते. आता आल्मंड मिल्क हवं असतं तेव्हा आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं. आमच्याकडे नॉर्मल दूधही मिळत नव्हतं'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News