मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salman Khan पुन्हा एकदा प्रेमात; 'या' साऊथ सुंदरीला करतोय डेट?

Salman Khan पुन्हा एकदा प्रेमात; 'या' साऊथ सुंदरीला करतोय डेट?

सलमान खान

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. बी-टाऊनचा बॅचलर सलमान कायमच चर्चेत असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 9 डिसेंबर : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. बी-टाऊनचा बॅचलर सलमान कायमच चर्चेत असतो. कोणताही चित्रपट असो किंवा रिलेशनशीप त्याच्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियवर चर्चा असते. अशातच सलमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यमागचं कारणंही काही खासच आहे. सलमान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची बातमी समोर येत आहे. सलमान सध्या एका साऊथ सुंदरीच्या प्रेमात आहे.

सलमान खान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. तो अभिनेत्री पूजा हेगडेच्या प्रेमात आहे. सध्या सोशल मीडियावर ही बातमी तुफान व्हायरल होत आहे. या चर्चेला उधाण येण्यामागचं कारण आहे एक ट्विट. उमेर संधू नावाच्या एका चित्रपट समीक्षकाने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. उमेरनं ट्विट करत म्हटलं, 'न्यू कपल इन द टाऊन. मेघास्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसने तिला पुढच्या दोन चित्रपटांसाठी साईन केले आहे. ते आजकाल एकत्र वेळ घालवत आहे. सलमानच्या जवळच्या सुत्रांनी याला दुजोरा दिला आहे.'

उमेरनं हे ट्विट करताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. दोघांचे फोटो आणि मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता ही अफवा आहे का खरंच दोघे एकमेघांना डेट करतायेत याविषयी अद्याप अधिकृतरित्या काहीही समोर आलेलं नाही. उमेर संधूच्या ट्विटमुळे या चर्चा रंगल्या आहेत. उमेरने यापहिलेही ट्विट करत क्रिती सेनन आणि प्रभास रिलेशनशीपमध्ये असल्याचं ट्विट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्याही रिलेशनशीपच्या चर्चा रंगताना दिसत आहे.

दरम्यान, सलमान खान आणि पूजा हेगडे या रिलेशनशीपच्या अफवांवर कधी मौन सोडणार आणि काय खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पूजा सलमानचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' मध्येही भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचीही सध्या जोरदार चर्चा आहे. याच चित्रपटात शहनाज गिलही भूमिका साकारताना झळकणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Salman khan