मुंबई, 15 डिसेंबर : सध्या सर्वत्र चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘पठाण’. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता शाहरुख खान स्टारर हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. यामागचं कारण म्हणजे नुकतंच प्रदर्शित झालेलं या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं. या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बोल्ड बिकीनीने सर्वत्र खळबळ उडवून दिली. अनेकांनी या मुद्द्यावरुन तिला आणि चित्रपटाला चांगलं धारेवर धरलं आहे. ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम व्यतिरिक्त सलमान खानही दिसणार आहे. सलमान या चित्रपटात एक कॅमिओ रोल करताना दिसणार आहे. या छोट्या भूमिकेसाठी सलमानने किती मानधन घेतलं आहे माहितीये का? सलमानने या चित्रपटासाठी कोणतीही फी घेतली नाहीये. त्याने पठाणमधल्या भूमिकेसाठी एकही रुपया न घेतल्यामुळे सध्या चाहतेही थक्क आहेत. मी कुठलीही फी आकारणार नाही या अचीवरच त्याने या भूमिकेसाठी होकार दिला आहे. हेही वाचा - Deepika Padukone bikini Controversy : दीपिकाच्या आधी ‘या’ अभिनेत्रींनी घातलेत भगव्या रंगाचे बोल्ड कपडे सलमान खानने पैसे न घेता काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने या अगोदरही अनेक चित्रपटांमध्ये मोफत काम केलं आहे. रिपोर्टनुसार सलमानने प्रेम रतन धन पायोसाठीही कोणती फी आकारली नव्हती. याशिवाय त्याने साऊथच्या गॉडफादरसाठीही फी आकारली नव्हती. मात्र पठाणच्या बाकी स्टारकास्टने बक्कळ फी घेतली आहे. दरम्यान, पठाणची मुख्य अभिनेत्री दीपिका पादुकोणने या चित्रपटासाठी तब्बल 15 कोटी रुपये घेतले आहेत. तर दुसरीकडे आपल्या अॅक्शनने चाहत्यांची मने जिंकणारा जॉन अब्राहम या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेत आहे. सिद्धार्थ आनंदने त्याच्या दमदार दिग्दर्शनासाठी 6 कोटी रुपये घेतले आहेत. आणि चित्रपटातील मुख्य अभिनेता किंग खानने चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतले आहे. शाहरुख खानच्या फी चा आकडा पाहूनच अनेकजण थक्क झाले आहेत.
शाहरुख दीपिकाचा ‘पठाण’ पुढच्या वर्षी 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या चित्रपट बॉयकॉटमध्ये अडकल्याचा दिसतोय. त्यामुळे याचा चित्रपटावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.