मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीला वारस कोण? अभिनेत्याने स्वत:च दिलं उत्तर

सलमान खानच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीला वारस कोण? अभिनेत्याने स्वत:च दिलं उत्तर

सलमान खान

सलमान खान

अनेक बॉलिवूड कलाकारांची मुंबईमध्ये आलिशान घरं आहेत. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान यांच्या घरांना तर आपल्या मालकांच्या बरोबरीनं प्रसिद्धी मिळालेली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 नोव्हेंबर : अनेक बॉलिवूड कलाकारांची मुंबईमध्ये आलिशान घरं आहेत. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान यांच्या घरांना तर आपल्या मालकांच्या बरोबरीनं प्रसिद्धी मिळालेली आहे. बॉलिवूडचा 'भाई' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सलमान खानच्या नावेही मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटींमध्ये आलिशान घरं आहेत. याशिवाय, त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत. सलमान खान फिल्म इंडस्ट्रीतील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्याचे चित्रपट नेहमीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. देशातील सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश होतो.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये 'सुलतान' चित्रपटासाठी त्याने 100 कोटींहून अधिक मानधन घेतलं होतं. इतकं मानधन घेणारा सलमान पहिला भारतीय अभिनेता ठरला होता. 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' या चित्रपटासाठीही त्यानं सुमारे 130 कोटी रुपये आकारले होते. एकूणच सलमान खान हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या पश्चात या संपत्तीचा वारस कोण असेल? याबाबत त्याच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. ‘अमर उजाला’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचा -  अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन

कोट्वधी रुपये किंमतीचं फार्म हाऊस

पनवेलमध्ये सलमानच्या मालकीचं फार्म हाऊस आहे. याला 'अर्पिता फार्म' असं देखील म्हणतात. शहरापासून फक्त एक तासाच्या अंतरावर हे फार्म हाऊस आहे. लॉकडाउन दरम्यान, पनवेलमध्ये सलमान आपले कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत राहिला होता. फार्म हाऊसमध्ये एक भव्य स्विमिंग पूल, जिम आणि हिरवळ आहे. या फार्म हाऊसची किंमत सुमारे 80 कोटी रुपये आहे.

30 कोटी रुपयांचा ट्रिपलेक्स फ्लॅट

मुंबईतील वांद्रे येथे सलमान खानचा 30 कोटी रुपये किमतीचा ट्रिपलेक्स फ्लॅट आहे. या चार बीएचके फ्लॅटमध्ये वरच्या मजल्यावर स्विमिंग पूल, मधल्या मजल्यावर पार्टी हॉल व पूल टेबल आणि खालच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट

याशिवाय अभिनेता सलमान खानचा मुंबईतील वांद्रे वेस्ट येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही फ्लॅट आहे. 16 कोटी रुपये किंमत असलेल्या याच घरामध्ये सलमान गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पालकांसोबत राहत आहे. त्याचे पालक अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहतात तर, तो तळमजल्यावर राहतो.

धारावीजवळ खरेदी केलं घर

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने मुंबईतील धारावी येथील गोराई या गावात एक भव्य मालमत्ता खरेदी केली आहे. त्याने त्याच्या 51व्या वाढदिवशी स्वत: साठी एक मोठं बीच हाऊस खरेदी केलं आहे. यात एक जिम, एक स्विमिंग पूल आणि एक मूव्ही थिएटरदेखील आहे.

परदेशात प्रॉपर्टी

दुबईच्या बुर्ज खलिफाजवळील 'द अॅड्रेस डाउनटाऊन' येथे सलमान खानच्या मालकीचं एक आलिशान अपार्टमेंट असल्याची माहिती आहे. तो अनेकदा तिथे वास्तव्याला जातो आणि सुंदर दुबई शहरात फिरताना दिसतो.

दोन हजार 300 कोटी रुपयांच्या संपत्तीला वारस कोण?

भरपूर यश आणि अमाप प्रसिद्धी मिळालेल्या सलमान खानला लग्न करण्याची इच्छा नाही, असं म्हटलं जातं. जर त्यानं लग्न केलं नाही तर त्याच्या कोट्वधी रुपयांच्या संपत्तीचा मालक कोण असेल? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. या प्रश्नाचं उत्तर सलमाननं एका मुलाखतीदरम्यान दिलं. सलमान म्हणाला होता, "मी लग्न करो किंवा नाही, माझ्या संपत्तीवर ट्रस्टचा हक्क असेल. माझं लग्न झालं तर अर्धी मालमत्ता ट्रस्टला दान केली जाईल. जर, मी लग्न केलं नाही तर माझी संपूर्ण मालमत्ता ट्रस्टला दिली जाईल."

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan