मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sajid Khan B’day: एकेकाळी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता साजिद खान; 'या' कारणामुळे तुटलं नातं

Sajid Khan B’day: एकेकाळी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता साजिद खान; 'या' कारणामुळे तुटलं नातं

साजिद खान-जॅकलीन फर्नांडिस

साजिद खान-जॅकलीन फर्नांडिस

बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धक आणि बॉलिवूडचा दिग्दर्शक साजिद खान एकेकाळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोबत रिलेशनशिपमध्ये होता. कसं होतं त्यांचं नातं जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 23 नोव्हेंबर : साजिद खानचा जन्म 23 नोव्हेंबर 1970 रोजी मुंबईत झाला. एक चित्रपट दिग्दर्शक, टीव्ही होस्ट, कॉमेडियन आणि अभिनेता साजिद खान 'MeToo' आरोपानंतर बराच काळ गायब होता. सध्या तो  टीव्हीवरील  प्रसिद्ध शो 'बिग बॉस' च्या सीझन 16 मध्ये दिसत आहे. साजिदची बहीण फराह खान ही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक आहे. साजिदच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या आयुष्याचा विचार केला तर ते एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रोमांचक नाही. साजिदच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि वादाबद्दल जाणून घ्या.

बॉलिवूडमध्ये 'हाऊसफुल' चित्रपट मालिका, 'हे बेबी', 'हिम्मतवाला', 'डरना जरूरी है' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन साजिद खानने केले आहे. त्याचे आजवरचे आयुष्य एवढे सोपे नव्हते. साजिदचे आई-वडील कामरान खान आणि मनेका इराणी एकेकाळी खूप श्रीमंती जगत होते, नंतर एक वेळ आली जेव्हा त्यांना गरिबीत राहावे लागले. त्यामुळे साजिद अनेक वाईट सवयीच्या आहारी गेल्याचे त्याने कबूल केले होते.

हेही वाचा - Sharad kelkar: शरद केळकरने दिला सुशांतच्या आठवणींना उजाळा; 'या' कारणासाठी केली शाहरुखशी तुलना

साजिदचे मन लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये होते, हा छंद त्याला दूरदर्शनपर्यंत घेऊन गेला. साजिदने दूरदर्शनच्या 'मैं भी जासूस' या शोमधून करिअरची सुरुवात केली. यानंतर अनेक शोमध्ये काम केले आणि होस्टिंगही केले. त्यानंतर चित्रपटांचे दिग्दर्शन सुरू केले. यश असे होते की मागे वळून पाहिलेच नाही. चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान तो जॅकलीन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते.

हाऊसफुल चित्रपटानंतर साजिद आणि जॅकलिनची जवळीक वाढली होती. साजिदवर तिचे प्रेम होते, असे स्वत: जॅकलिनने सांगितले होते. पण साजिद तिच्यावर अनेक बंधने घालायचा. जसे की त्याला अभिनेत्रीचे छोटे कपडे घालणे अजिबात आवडत नव्हते. इतकंच नाही तर जॅकलीननं कोणत्याही चित्रपटात ग्लॅमरस भूमिका साकारण्याचा तो ठाम विरोधात होता.

साजिद जॅकलिनला बंधनात ठेवायचा प्रयत्न करायचा. पण तिला ते नको होते. अभिनेत्रीला चित्रपटांमध्ये खुल्या मनाने काम करायचे होते, तिला कुठलेही बंधन नको होते. याच कारणामुळे 2013 मध्ये साजिद आणि जॅकलिनचे ब्रेकअप झाले होते. साजिद आणि जॅकलिनच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. दोघेही लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती पण दोन वर्षांतच त्यांचे नाते संपुष्टात आले.

दरम्यान, साजिद खान पुन्हा एकदा वादात सापडला. त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. #MeToo मोहिमेदरम्यान अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी साजिदवर आरोप केले. शर्लिन चोप्रा, सिमरन सुरी, मंदाना करीमी यांच्यासह पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनीही साजिदवर आरोप केले. आजही अनेक जण समोर येत त्याच्यावर आरोप करत आहेत.  बऱ्याच दिवसांपासून गायब असलेला साजिद खान आता टीव्ही शो 'बिग बॉस 16'मध्ये सिनियरच्या भूमिकेत दिसत आहे. साजिद आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करताना अनेकदा भावूक होतो.

First published:

Tags: Bigg boss, Bollywood actress, Bollywood News, Jacqueline fernandez