मॉडेल आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी बहारीनमध्ये मनामा इथे झाला. तिच्या वडिलांचं नाव एलरॉय फर्नांडिस, तर आईचं नाव किम आहे. तिचे वडील श्रीलंकन, तर आई मलेशियन-कॅनेडियन आहे. तिचे वडील श्रीलंकेत म्युझिशियन होते, तर आई एअर होस्टेस होती. जॅकलिनला एक मोठी बहीण आणि दोन मोठे भाऊ आहेत. चार भावंडांमध्ये ती सर्वांत थोरली आहे. तिचं शालेय शिक्षण बहरीनमधल्या सॅक्रेड हार्ट स्कूलमध्ये झालं. तिने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर श्रीलंकेत टेलिव्हिजन रिपोर्टर म्हणून काम सुरू केलं. नंतर ती मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये गेली. 2006 मध्ये ती मिस युनिव्हर्स श्रील