मुंबई, 18 ऑक्टोबर : सध्या बिग बॉस 16 हा शो जोरात सुरू आहे. बिग बॉसचं घर म्हणजे वाद विवाद आलेच. हा कार्यक्रमाचा प्रत्येक सिझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहतो. ‘बिग बॉस हिंदी’च्या 16 व्या पर्वाला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. सध्या बिग बॉस घरातील एका सदस्यांमुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो सदस्य म्हणजे साजिद खान. स्पर्धक म्हणून त्याने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून प्रेक्षक संतापले आहेत. त्यानंतर आता साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शो मधून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. पण त्याबद्दल निर्मात्यांनी काही भूमिका घेतली नाही. त्यानंतर दररोज अनेक अभिनेत्री त्याच्यावर आरोप करत आहेत. पण आता एका अभिनेत्यासुद्धा त्याला या शो मधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
नुकतंच सलमान खानने साजिदला शो मधून बाहेर काढल्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली होती. तरीही साजिद खानला होणारा विरोध हा दिवसेंदिवस वाढतोच आहे. हे प्रकरण तापलेलं असताना आता आणखी एका अभिनेत्याने साजिद खानवर निशाणा साधला आहे. बॉलिवूडचा गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजल यानेही साजिद खानला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून विरोध दर्शवला आहे.
हेही वाचा - Sajid Khan: 'मी अनेक मुलींसोबत...'; साजिद खानचा धक्कादायक खुलासा, पाहा तो VIDEO
एका दुसऱ्या आकाऊंटवरील साजिद खानचा फोटो आपल्या स्टोरीमध्ये शेयर करत अलीने लिहिलं आहे कि, “साजिद खानला त्वरित बिग बॉसमधून बाहेर काढा.” अलीच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. बॉलिवूडमधील अली हा पहिला अभिनेता आहे ज्याने साजिद खानविषयी एवढं मोठं वक्तव्यं केलं आहे. त्याला अनेक चाहत्यांकडून पाठींबा मिळत आहे. आता त्यांच्याप्रमाणेच इतर कोणी अभिनेता समोर येतो का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.
अलीकडेच दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून चित्रपट निर्माते साजिद खान यांना त्यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांमुळे बिग बॉसमधून बाहेर काढण्याची मागणी केली होती. मात्र, सोशल मीडियावर तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. तिने पुढे दिल्ली पोलिसांना बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या लोकांना अटक करण्याची मागणी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
चित्रपटसृष्टीतील महिलांवर अत्याचार झाला त्या रोषातून मीटू प्रकरणाला सुरुवात झाली होती. त्यात अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांची नावे समोर आली होती. या प्रकरणात साजिद खानवर महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता त्यामुळे महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साजिद खानला ‘बिग बॉस’मध्ये पाहून प्रेक्षक संतापले आहेत. अनेक अभिनेत्रींनीही त्याविषयी संताप व्यक्त केला आहे. त्याला या शो मधून काढण्याची मागणी अनेक महिला प्रेक्षकांकडून होत असताना आता सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही याला विरोध दर्शविला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bollywood actor, Entertainment, Salman khan