मुंबई, 2 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे अशा बातम्या येत होत्या. बेगुसराय, बिहार येथील न्यायालयाने एकता कपूरच्या XXX या वेब सीरिजविरुद्ध अटक वॉरंट पाठवले आहे. बातम्यांनुसार, एकतावर आरोप आहे की, तिने या वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीची आक्षेपार्ह प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, आता एकताच्या वकिलाने मोठा खुलासा केला आहे. आता या वृत्तांविरोधात एकता कपूरच्या वकिलाचे वक्तव्य समोर आले आहे. एकता आणि तिची आई शोभा कपूर यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन करताना, वकील म्हणतात, “अलीकडच्या काळात, बेगुसराय, बिहार येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुश्री एकता कपूर आणि श्रीमती शोभा कपूर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्याचा आरोप आहे. बातम्यांचे लेख आहेत. तक्रार दाखल करणार्या व्यक्तीच्या वकिलाच्या कथित विधानांच्या आधारे तयार केलेले हे वृत्त लेख सर्व पूर्णपणे खोटे आणि चुकीचे आहेत, कारण सुश्री एकता कपूर किंवा श्रीमती शोभा कपूर यांना कोणतेही अटक वॉरंट मिळालेले नाही.’’ हेही वाचा - Malaika-Arjun: ‘मी त्यासाठी अजून तयार नाही’; अर्जुनसोबत लग्न करण्याविषयी हे काय बोलून गेली मलायका? मीडिया रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या या वेबसीरिजला लष्कराचा अपमान मानून गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये बेगुसरायच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी सांगितलं होतं की, वेबसीरिज कंपनीच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी ही निकृष्ट वेबसीरिज एका वेब पोर्टलवर टाकली होती. ज्यामध्ये भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला होता. हेही वाचा - Kareena-Saif: आधी जीप दुसऱ्याच दिवशी मर्सिडीज; दसऱ्याआधीच करीना-सैफची कोट्यावधींची खरेदी जर या संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगायचं तर, हे संपूर्ण प्रकरण एकता कपूरच्या ‘ट्रिपल एक्स सीझन 2’ मधील काही दृश्यांबद्दल आहे. मालिकेच्या कथेत 2 सैनिकांच्या पत्नींची आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. कथेनुसार, सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपल्या कर्तव्यावर जातात, ते गेल्यानंतर दोघांच्या बायका इतर पुरुषांशी शारीरिक संबंध बनवतात. 6 जून 2020 रोजी माजी सैनिक शंभू कुमार यांच्या वतीने CGM न्यायालयात तक्रार पत्र दाखल करण्यात आले होते.
या मालिकांमुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होत असल्याचे शंभूशिवाय अनेक माजी सैनिकांचे मत आहे. अशा वेब सिरीज पाहिल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल. हे सर्व पाहून लोक प्रचंड संतापले आहेत. पण आता तिच्याविरुद्ध निघालेलं अटक पत्र खोटा असल्याचा खुलासा वकिलाने केला आहे.