मुंबई,2 ऑक्टोबर- बॉलिवूड कलाकारांची लाईफस्टाईल चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरते. कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचं बारकाईने लक्ष असतं. तर बॉलिवूड कलाकार आपल्या कपड्यांपासून गाड्यांपर्यंत सर्वच महागड्या गोष्टींनी सर्वसामान्य लोकांना थक्क करत असतात. असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या आलिशान लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान होय. छोटा नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफकडे अनेक महागड्या कार आहेत. आता या जोडप्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका लग्जरी कारची भर पडली आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानने नुकतंच नवी मर्सिडीज खरेदी केली आहे. पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना आणि सैफ आपल्या लेकासोबत नव्या मर्सिडीजचं स्वागत करताना दिसून येत आहेत. यावेळी त्यांचा संपूर्ण स्टाफदेखील उपस्थित आहे. या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. करीना आणि सैफचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. तर काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत. कारण एक दिवस आधीच करीना-सैफने मोठा मुलगा तैमूरसाठी एक जीप खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. या जीपची किंमत जवळजवळ 60 ते 70 लाख असल्याचं म्हटलं जात आहे. इतका पैसा खर्च करण्यापेक्षा गरिबांना अन्नदान करण्याचा सल्ला नेटकरी देत आहेत. करीना कपूरची संपत्ती- 2000 साली ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून करीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चनने मुख्य भूमिका साकारली होती. कपूर खानदानाची लेक आणि नवाब कुटुंबाची सून असूनदेखील करीनाने स्वतःच्या कलेच्या जोरावर अफाट संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार करीना कपूर एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये मानधन घेत होती. काही काळापूर्वी अभिनेत्रीने आपलं मानधन वाढवत 10 कोटी केलं आहे. करीना कपूरची संपत्ती 440 कोटींची आहे.
सैफ अली खान संपत्ती- मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा मुलगा आणि अभिनेता सैफ नेहमीच आपल्या राजेशाही थाटाने लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. सैफ एक गर्भश्रीमंत अभिनेता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खान महिन्याला 3 कोटींची कमाई करतो. तर हा अभिनेता वर्षाला तब्बल 30 कोटी रुपये मिळवतो. त्याच्या खानदानी राजवाड्याची किंमत 800 कोटींपेक्षाही जास्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खानची एकूण संपत्ती 1100 कोटींपेक्षा जास्त आहे.
(हे वाचा: 500 कोटींमध्ये बनलाय Ponniyin Selvan; ऐश्वर्या राय नव्हे तर ‘या’ सेलिब्रेटीला मिळालंय जास्त मानधन **)** कार कलेक्शन- करीना आणि सैफला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. या दोघांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लग्जरी कार आहेत. या दोघांकडे बीएमडब्ल्यू, मस्टान्ग, रेंज रोव्हर, लँड क्रुझर,लेक्सस 470 यांसारख्या आलिशान कार आहेत. यामध्ये आता आणखी एका मर्सिडीजचा समावेश झाला आहे.