मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Malaika-Arjun: 'मी त्यासाठी अजून तयार नाही'; अर्जुनसोबत लग्न करण्याविषयी हे काय बोलून गेली मलायका?

Malaika-Arjun: 'मी त्यासाठी अजून तयार नाही'; अर्जुनसोबत लग्न करण्याविषयी हे काय बोलून गेली मलायका?

मलायका अरोरा

मलायका अरोरा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांच लक्ष होतं. पण नुकत्याच एका मुलाखतीत मलायकाने लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 2 ऑक्टोबर : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा  हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहे. या दोघांनी त्यांच्यातील नाते कधीच लपवून ठेवलेले नाही. अनेकदा हे हॉट कपल एकत्र स्पॉट झालं आहे. दोघे एकदम खुल्लम खुल्ला प्रेम करताना दिसतात.  अर्जुन कपूर आणि मलायका  हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांच लक्ष होतं. पण नुकत्याच  एका मुलाखतीत मलायकाने लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये तिने अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल मोकळेपणाने आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याची आता सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.

मलायका अरोराला एका मुलाखतीत लग्नाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर तिने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा होतेय. मलायका सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत लग्न करण्यास तयार नाही तिने असे उत्तर दिले आहे. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, ''लग्न करणं हा कुठल्याही नात्यातील महत्वाचा टप्पा असतो. मला वाटत की लग्नासाठी घाई करू नये कारण तो एक सामाजिक दबाव आहे. जेव्हा तुम्हाला लग्नासाठी योग्य कारण सापडेल तेव्हाच ते करा. कधीकधी पालक तुमच्यावर जबरदस्ती करतात. तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर ते सुंदर आहे. जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा मला असे वाटते की मी आत्ताच त्याचे उत्तर द्यायला तयार नाही.''

हेही वाचा - Kareena-Saif: आधी जीप दुसऱ्याच दिवशी मर्सिडीज; दसऱ्याआधीच करीना-सैफची कोट्यावधींची खरेदी

पुढे, तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, ''मी अर्जुनशी फक्त अटॅच नाही तर तो माझा खूप चांगला मित्रही आहे. तुमच्या जिवलग मित्रावर प्रेम करणे आणि प्रेमात पडणे खूप महत्वाचे आहे. अर्जुन मला भेटतो आणि तो मला समजून घेतो. मला वाटते की आम्ही दोघे एकमेकांचे सर्वात मोठे चीअरलीडर्स आहोत. मी त्याच्यासोबत प्रत्येक गोष्टीबद्दल बोलू शकतो. त्याच्या आसपास असण्याने मी आनंदी होते.''

याशिवाय मलायका अरोराच्या मुलाखतीत अरबाज खानसोबतच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावर ती म्हणाली  की तिच्यात आणि अरबाजमध्ये खूप चांगली मैत्री आहे. आमचे मार्ग वेगळे झाल्यापासून ही समज अधिक चांगली झाली आहे. जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की अरबाज आणि त्याच्यात मैत्री कायम राहील का? यावर ती म्हणाली , 'आमची परस्पर समज खूप चांगली आहे. आपण पुरेसे परिपक्व आहोत. तो एक चांगला व्यक्ती आहे. मी फक्त त्याला त्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ शकते.''

 

मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. हे दोघे वयाच्या अंतरामुळे अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. पण त्यांचं वय त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत नाही. दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करत असतात. अर्जुन आणि मलायका एकमेकांच्या कुटुंबाच्या फारच जवळ आहेत. अर्जुन कपूर अनेकवेळा मलायकाचा लेक अरहानची काळजी घेताना दिसून आला आहे. तर दुसरीकडे मलायकासुद्धा अर्जुनची बहीण अंशुलाची काळजी घेताना दिसून येते. त्यामुळेच हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांच लक्ष होतं. पण तिने आता लग्नाच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood actress, Entertainment