जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ekta Kapoor: एकता-शोभा कपूरविरुद्ध वॉरंट जारी; होणार अटक?

Ekta Kapoor: एकता-शोभा कपूरविरुद्ध वॉरंट जारी; होणार अटक?

एकता-शोभा कपूर

एकता-शोभा कपूर

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर आणि आई शोभा कपूर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 सप्टेंबर-  बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर आणि आई शोभा कपूर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बिहार न्यायालयाने या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. वेबसीरीज XXX संदर्भात कोर्टाने हे अटक वॉरंट जारी केलं आहे. ज्यामध्ये देशाच्या सैनिकांच्या पत्नीचे सैनिकांच्या गणवेशात इतर लोकांशी शारीरिक संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते. आता बिहारच्या बेगुसरायमध्ये दाखल झालेल्या या तक्रारानंतर अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या या वेबसीरिजला लष्कराचा अपमान मानून गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये बेगुसरायच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी सांगितलं की, वेबसीरिज कंपनीच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी ही निकृष्ट वेबसीरिज एका वेब पोर्टलवर टाकली होती. ज्यामध्ये भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला होता. देशाचं रक्षण करणारे भारतीय सैनिक, ज्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आज सुरक्षित आहे. या वेबसीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीबाबत काही अत्यंत चुकीचे सीन दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. अधिवक्ता पाठक यांनी सांगितले की, या वेब सीरिजच्या निर्मात्यांवर विविध जिल्ह्यांमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बेगुसरायमध्येही एक्स-सर्व्हिसमेन सेलचे शंभू कुमार यांनी बेगुसराय कोर्टात खटला दाखल केला होता. (**हे वाचा:** Indian Idol 13: बॉयकॉट बॉलीवूडनंतर आता इंडियन आयडॉल बॉयकॉटची मागणी; काय आहे प्रकरण? ) समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील वकिलाने सांगितलं की, हे प्रकरण राजीव कुमार यांच्या कोर्टातून विकास कुमार यांच्या कोर्टात हस्तांतरित करण्यात आलं आहे. आणि तेथूनच हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अधिवक्ता हृषिकेश पाठक यांनी सांगितलं की, तमिला अहवालाची पुष्टी करताना या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात