कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचे आज सकाळी निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान त्यांचे शेवटचे स्वप्न आता अधुरेच राहिले आहे. राजू यांनी कॉमेडी क्षेत्रासाठी खास स्वप्न पाहिले होते. काय स्वप्न होते ते पाहा.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं ते 58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
2/ 10
राजू श्रीवास्तव हा केवळ विनोदी अभिनेता नव्हते तर भातातील मध्यमवर्गीय लोकांना आपलीशी वाटेल अशी कॉमेडी ते करायचे. म्हणूनच ते भारतातील घराघरात लोकप्रिय होते.
3/ 10
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. राजूच्या या अवस्थेबद्दल त्याचे चाहतेही खूप नाराज झाले होते.चाहतेही त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते मात्र आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
4/ 10
दरम्यान त्यांचे शेवटचे स्वप्न आता अधुरेच राहिले आहे. राजू यांनी कॉमेडी आणि सिनेमा यांचा मेळ घालण्याचे खास स्वप्न पाहिले होते.
5/ 10
राजूचे शेवटचे स्वप्न होते की उत्तर प्रदेश, बिहार आणि चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावणाऱ्या या प्रांतातील कलाकारांना अभिनयविश्वात नाव कमवण्यासाठी मुंबई गाठावी लागू नये.
6/ 10
त्यांच्यासाठी नोएडामध्ये उभारली जाणारी फिल्म सिटी ही या सगळ्या समस्येवर तोडगा होता. यामुळेच तो 'नोएडा फिल्म सिटी' च्या उभारणीकडेआशेने राजू श्रीवास्तव पाहत होते.
7/ 10
राजू हे यूपी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे चेअरमनही होते आणि त्यामुळेच त्यांना उत्तर प्रदेशातील सिनेमा पुन्हा जिवंत करायचा होता.
8/ 10
न्यूज18 हिंदीशी बोलताना राजू एकदा म्हणाले की, दिल्ली, यूपी, मध्यप्रदेश आणि बिहारमधून अनेक लोक तिथे जातात तेव्हा त्यांनी मुंबईत का भटकायचे?
9/ 10
नोएडामध्ये फिल्मसिटी झाली तर अनेक प्रादेशिक लेखकांना येथे काम करण्याची आणि आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. म्हणून ते इथे फिल्मसिटी उभारण्यासाठी धडपडत होते.
10/ 10
पण आता राजू राहिलेला नाही आणि त्याचे ते शेवटचे स्वप्नही अधुरे राहिले आहे. त्यासाठी चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.