मुंबई, 26 डिसेंबर: बिग बॉस मराठी 4 च्या घरात केवळ 14 दिवस उरले आहेत. 8 जानेवारीला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले रंगणार आहेत. दरम्यान आता घरात एकूण 7 सदस्य उरले आहेत. त्यातील 1 सदस्य घराबाहेर जाऊन बाकीचे टॉप 6 सदस्या फिनालेमध्ये पाहायला मिळणार आहेत. दरम्यान मागच्या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सदस्यांबरोबर घरातील टॉप 5 कोण? असा गेम खेळला. या खेळात घराबाहेर गेलेली तेजस्विनी लोणारी हिचं नाव सगळ्या सदस्यांनी घेतलं. प्रत्येकाच्या तोंडावर तेजस्विनीचं नाव होतं. प्रेक्षकांसाठी ती तेजस्विनी लोणारी ही विजेती आहेच मात्र घरातील सदस्यांनी देखील टॉप 5मध्ये तेजस्विनीचं नाव घेतलं. हे पाहून तेजस्विनी चांगलीच भारावली आहे. तिनं पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. तेजस्विनी लोणारीच्या हाताला टास्क दरम्यान दुखापत झाली. काही दिवस ती दुखऱ्या हातानं घरात वावरत होती मात्र त्रास वाढल्यानं तिला प्रत्येक कामासाठी इतर सदस्यांची मदत घ्यावी लागली. तेजस्विनीनं दुखऱ्या हातानं घरात राहण्याची तयारी दाखवली होती मात्र बिग बॉसनं तिच्या भविष्याचा विचार करून तिला घरातील खेळ थांबवण्याचा निर्णय दिला. पहिल्या दिवसापासून जिच्याकडे विजेती म्हणून पाहिलं गेलं अशा तेजस्विनीच्या मध्येच झालेल्या एक्झिटनं तिच्या चाहत्यांना जबरदस्त झटका बसला. मात्र आजही टॉप 5च्या यादीत तेजस्विनीलाच प्रेक्षक पाहत आहेत. हेही वाचा - Tejaswini Lonari exclusive : तेजस्विनीच्या हाताला नेमकं काय झालंय? 1-2 नाही तर इतके दिवस राहिल फ्रॅक्चर
टॉप 5 कोण या खेळात प्रत्येक सदस्यांनी तेजस्विनीचं नाव घेतलं. या गेमची छोटी क्लिप तेजस्विनीनं शेअर केली आहे. त्याचप्रमाणे पोस्ट शेअर करत तिनं म्हटलं आहे की, ‘बिग बॉस ची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी प्रेक्षकांची आणि प्रतिस्पर्ध्यांची मने जिंकता आली याचा आनंद खूप मोठा आहे. दुर्दैवाने टॉप 5 मध्ये मी नसणार आहे. पण माझ्या शुभेच्छा मात्र माझ्या टॉप ५ मधील प्रतिस्पर्धी मित्रांसोबत असतीलच..! तुमच्या या प्रेमाबद्दल शब्दच नाहीत..!’
तेजस्विनीच्या या पोस्ट चाहत्यांनी दणकून कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं म्हटलंय, ‘टॉप 5 काय विनर होतीस तू’. तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘पुढच्या बिग बॉसला तू ये तेजू. आम्ही खूप मिस करतोय तुला’. तर आणखी एका युझरनं म्हटलंय, ‘आमच्यासाठी तुम्हीच विनर होता आणि तुम्हीच विनर आहात. मी घरातील एकाही सदस्याला विनर समजत नाही’.