मुंबई,08 डिसेंबर : बिग बॉस मराठी 4 ची सगळ्यांची लाडकी स्पर्धक तेजस्विनी लोणारी. घरात टास्क दरम्यान झालेल्या अपघातावेळी तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्यानं तिला नाईलाजानं घराबाहेर पडावं लागलं. तेजस्विनीच्या जाण्यानं सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. तिचं जाणं कोणालाही मान्य नव्हतं. पण काळजावर दगड ठेवून घरातील सगळ्या सदस्यांनी तेजूला आणि तेजूनं घरातून निरोप घेतला. तेजस्विनीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानं बिग बॉसनं इतका मोठा निर्णय घेतला. घराबाहेर पडल्यानंतरही तेजस्विनीला तितकंच प्रेम मिळत आहे जितकं तिला घरात राहून मिळत होतं. प्रेक्षक आणि कलाकारही तेजूसाठी प्रेम व्यक्त करत आहे. पण आपली धडधाकट मुलगी इतक्या उत्साहानं घरात गेली आणि अशारितीनं घरातून बाहेर आली हे पाहून तेजस्विनीच्या आईनं पहिली प्रतिक्रिया काय दिली याबद्दल तेजस्विनीनं News18 लोकमतशी बोलताना सांगितलं.
तेजस्विनीला टास्क दरम्यान हाताला लागलं तेव्हा त्यानंतर पुढचा एक दिवस तिनं कोणालाही याबद्दल सांगितलं नाही, असं ती म्हणाली. मात्र हळूहळू तिचा त्रास वाढत गेला तसं बिग बॉसनी ही गोष्ट सर्वांना सांगितली. अखेर तेजस्विनीच्या भल्यासाठी बिग बॉसनी तिला इविक्ट करण्याचा निर्णय घेतला.
घरातून बाहेर पडल्यानंतर एक रात्र तेजू एका हॉटेलमध्ये थांबली होती. तिथंही तिला हॉटेलचे कर्मचारी भेटले त्यांनीही तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं. तुम्ही आता बाहेर कशा आलात. तुम्ही तर विनर होतात, असं म्हणत त्यांनी प्रेम व्यक्त केलं. तसंच तेजू हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हाही तिला आजोबा भेटले जे देवाकडे प्रार्थना करत होते की माझा हात बरा होण्यास काही दिवस लागूदेत पण तेजस्विनीचा हात लवकर बरा कर आणि तिला घरात पाठव.
घराबाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम पाहून तेजस्विनी भारावून गेली होती. ती घरी तेव्हा आई तिला घ्यायला आली होती. आईनं पहिल्यांदा तेजूला पाहिलं तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी होती याबद्दल सांगताना तेजू म्हणाली, 'मी घरी आले तेव्हा आईनं मला खूप नॉर्मल रिसिव्ह केलं'. ती म्हणाली, 'काय गं, काय झालं? काय मग? खूप असा गाजा वाजा केला नाही. मला वाटत होतं फटाके वगैरे फोडतील पण असं काहीच झालं नाही'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news