मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tejaswini lonari : '...त्यामुळे मनात नसतानाही बाहेर यावं लागलं'; अखेर तेजस्विनीने सांगितलंच घराबाहेर येण्याचं खरं कारण

Tejaswini lonari : '...त्यामुळे मनात नसतानाही बाहेर यावं लागलं'; अखेर तेजस्विनीने सांगितलंच घराबाहेर येण्याचं खरं कारण

तेजस्विनी लोणारी

तेजस्विनी लोणारी

'बिग बॉस मराठी 4' चा सध्या सर्वत्र धुमाकूळ पहायला मिळतोय. शो आणि शोमधील स्पर्धक दोन्हींविषयी प्रेक्षक चर्चा करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 8 डिसेंबर : 'बिग बॉस मराठी 4' चा सध्या सर्वत्र धुमाकूळ पहायला मिळतोय. शो आणि शोमधील स्पर्धक दोन्हींविषयी प्रेक्षक चर्चा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रत्येक स्पर्धक आणि त्यांच्या खेळाविषयी चर्चा करतायेत. अशातच बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली  तेजस्विनी लोणारीचं नाव सध्या प्रेक्षकांच्या ओठांवर पहायला मिळतंय. तेजस्विनीचा हात, तेजस्विनीने पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घ्यावी, अशा अनेक गोष्टींवर प्रेक्षक आणि तेजूचे चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेजस्विनीने न्यूज 18 लोकमतची बोलताना दिली आहेत.

तेजस्विनी लोणारीने बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर नुकताच न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. या मुलाखतीमध्ये तेजूने जवळपास चाहत्यांच्या आणि बिग बॉस प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. या मुलाखतीत तेजूने पहिल्यांदा तिच्या हाताविषयी सगळ्यांना माहिती दिली. तेजूने सांगितलं की, हात फ्रॅक्चर झाला नाहीये. उजव्या हाताचं चौथ बोटाला बेटाकार्पलजवळ एक क्रॅक आलाय. त्यामुळे ती बोट आणि हात जास्त हालवू शकत नाही. हाताची जास्त हालचाल होऊ नये म्हणून संपूर्ण हातालाच प्लास्टर केलं आहे.

बिग बॉसने दिलेल्या निर्णयाविषयी तेजस्विनी पुढे म्हणाली की, मला खरंच वाटत होतं की बिग बॉसने माझं ऐकायला हवं होतं. कारण मी सगळ्या जबाबदारी घ्यायला तयार होते. माझ्या हाताविषयीच्या प्रत्येक जबाबदारी मी घ्यायला तयार होते. पण बिग बॉसने तुझ्या भविष्यासाठी हा निर्णय असल्यातं सांगितलं. त्यामुळे मनात नसतानाही मला बिग बॉसचं ऐकावं लागलं.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी 4' मुळे तेजस्विनी लोणारी प्रेक्षकांचं भरभरुन प्रेमही मिळालं. यासाठी तेजस्विनीने प्रेक्षकांचं खूप खूप आभार मानलं. तिला एवढं प्रेम मिळेल हे अपेक्षित नव्हतं त्यामुळे ती खूप आनंदी आहे. आता तिला तिच्या नवाने लोक ओळखतात 'तेजस्विनी लोणारी'. याविषयी बोलताना ती म्हणाली की, मी एखादी भूमिका करुनहू मला एवढं प्रेम मिळालं नसतं. मात्र आत माझ्या नावाने लोक मला ओळखतात हे मला खूप छान वाटतंय.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment