मुंबई, 10 जुलै- सध्या बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक मिनिटाला नाती बदलताना दिसत आहेत. कोण कधी कोणाच्या विरोधात आणि कधी बाजूने बोलेल याचा काही नेम नाही. एवढंच काय कर कोण कोणाच्या ग्रुपमध्ये जाईल हे सुध्दा सांगता नाही. एकमेकांमध्येच बरेच गैरसमज आहेत, त्यामुळे सदस्यांना कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हेच कळत नाहीये. वीणाने काल रुपालीसोबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि रुपालीने देखील तिला सांगितले तू कशीही वागलीस तरीदेखील मी तुझ्या पाठीशी उभी असेन. त्यामध्ये काल किशोरी शहाणे यांना वीणाने स्पष्ट सांगितले की, त्या कोणत्याही ग्रुपमध्ये नसून वैयक्तिक खेळत आहेत. तर, रुपालीने किशोरी ताईंना आधार देत जसं आपण परागच्या वेळेस केले तसेच यावेळेस देखील वीणाला सांगू आणि पुढे जाऊ असं सांगितलं. याचसोबत घरामध्ये काल अभिजीत आणि रुपालीमध्ये कॅप्टनसी टास्क रंगला. आज घरात नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. यात समोरच्या स्पर्धकाचे तिकीट मिळवून सेफ होण्याचा प्रयत्न प्रत्येक स्पर्धकाला करायचा आहे. या टास्कदरम्यान नेहा वीणाला म्हणाली की, आपल्या दोघींमध्ये कोणी एक सेफ होऊ शकतं तर तू तुझं तिकीट मला दे कारण या आठवड्यात मला रिस्क आहे. वीणानेही नेहाकडे स्वतःला सेफ करण्यासाठी तिकीट मागितलं. पण नेहाने ते देण्यास नकार दिला. अखेर वीणा म्हणाली की, जर तिला तिकीट मिळालं नाही तर ती नेहालाही देणार नाही आणि शेवटी दोघीही नॉमिनेशनमध्ये जातील. आता सदस्य समोरच्या सदस्याला तिकीट देऊन सेफ होण्याची संधी देतील का आणि यात कोण नॉमिनेशनमध्ये जाईल हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री घेऊन आलेल्या हिना पांचाळने घरात काही सदस्यांची मनं जिंकली तर काहींसोबत तिचे मतभेद झाले. यात वीणा आणि शिवसोबत तिचे बऱ्याचदा खटके उडाले. तर माधव आणि नेहा तिचे जवळचे मित्र झाले. नेहाची प्रत्येक छोटी- मोठी गोष्ट, तिला खटकणारी गोष्ट हिनाने तिच्या तोंडावर सांगितली आहे. आजदेखील नेहा, माधव आणि हिनात एका विषयावर चर्चा होत असताना ती स्वतःचं मत स्पष्ट मांडताना दिसणार आहे. नेहाच्या म्हणण्यानुसार अभिजीत आणि वैशाली कोणामध्ये भांडण झाले तर ते अजून वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण आपण कोणाच्याच भांडणात पडायचं नाही. ते वाढवायलाही जायचं नाही आणि ते मिटवायलाही जायचं नाही. यावर हिना म्हणाली की, मी कोणाकडेही जात नाही. पण समोरून जर कोणी स्वतःहून बोलायला येत असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मला असं वाटत, जर त्यांना माझ्याशी बोलावसं वाटत तर बोलू द्यावं. घरात जर कोणाला एकटं वाटत असेल किंवा कोणाला एकटं पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे बोलायला जाणार. त्या माणसाशी पाच मिनिटं बोलल्याने माझं काहीच बिघडणार नाही. हेही वाचा-
टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल
भारत- न्युझीलंड सामन्यादरम्यान हा खेळाडू फिरतोय क्रोएशिया आणि इटलीत
‘मुस्लीम ज्वालामुखी होऊन फुटतील तेव्हा सर्व कलमा वाचायला लागतील,’ एजाज खान
World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव
SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.