Home /News /entertainment /

World Cup-अभिनेत्याने केली भविष्यवाणी- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव

World Cup-अभिनेत्याने केली भविष्यवाणी- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव

Ind vs Nz: आताही सोशल मीडियावर वादग्रस्त ट्वीट करण्यासाठी तो ओळखला जातो. वर्ल्ड कपशी निगडीत या भविष्यवाणीसाठीही त्याला जबरदस्त ट्रोल केलं जात आहे.

    मुंबई, 09 जुलै- Ind vs Nz: देशभरात आज फक्त वर्ल्ड कप 2019 च्या उपांत्य फेरीतील भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्याचीच चर्चा आहे. एकीकडे क्रिकेट चाहत्यांमध्ये सामन्याचा उत्साह दिसत आहे तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने आज सामना आणि वर्ल्ड कपमध्ये कोण जिंकेल याबद्दल ट्वीट केलं आहे. त्याचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंगळवारी भारतविरुद्ध न्युझीलंड यांच्या सामन्याबद्दल कमाल आर खानने ट्वीट करत म्हटलं की, हा सामना कोहली सेनाच जिंकेल. तसेच त्याने भविष्यवाणी करत पुढे लिहिलं की, उपांत्य फेरीतील सामना टीम इंडिया जिंकून न्युझीलंडला हरवेल आणि ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंड अंतिम सामन्यात जाईल. यानंतर भारत आणि इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगेल, ज्यात इंग्लंडचा ऐतिहासिक विजय होईल आणि भारताचा पराभव होईल. बॉलिवूडमधील देशद्रोही या सिनेमात केआरकेने काम केलं होतं. यानंतर तो सलमान खानच्या बिग बॉस सीझन ३ मध्ये दिसला होता. या शोमध्ये तो अनेक वादांमध्ये अडकला होता. आताही सोशल मीडियावर वादग्रस्त ट्वीट करण्यासाठी तो ओळखला जातो. वर्ल्ड कपशी निगडीत या भविष्यवाणीसाठीही त्याला जबरदस्त ट्रोल केलं जात आहे. लग्नाच्या आठ वर्षांनंतर या अभिनेत्याच्या घरी आली ‘नन्ही परी’ या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार ‘याला तर इज्जत काढून घ्यायची सवयच लागली’, पुन्हा एकहा हृतिकवर भडकली रंगोली चंडेल EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर
    Published by:Madhura Nerurkar
    First published:

    Tags: 2019 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या