टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल

टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल

नीरजशी लग्न तुटल्यानंतर पूजाने दोन वर्ष विकास कारांतरीला डेट केलं. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत सुहासीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पूजा घईने लग्न केलं. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यात ती नवरा आणि भावासोबत दिसत आहे. पूजाने व्यावसायिक नौशीरशी लग्न केलं.  दोघं अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाचे फोटो शेअर करताना पूजाने लिहिले की, 'माझ्या आधाराचे दोन स्तंभ आहेत. सर्व एकाच फ्रेममध्ये.. माझी आई, माझा कुकी, माझा भाऊ, माझी ताई आणि माझा नौशू.' पूजाचं हे तिसरं लग्न आहे. याआधी तिने नीरज रावलशी लग्न केलं होतं. दोघांचा एक मुलगाही आहे. मात्र मतभेदांमुळे पूजा आणि नीरजचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि 2007 मध्ये दोघं वेगळी झाली.

नीरजशी लग्न तुटल्यानंतर पूजाने दोन वर्ष विकास कारांतरीला डेट केलं. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही. पूजाला लग्न करायचं होतं पण जेव्हा असं होऊ शकत नसल्याचं तिला दिसलं तेव्हा तिने ब्रेकअप करणंच योग्य समजलं. मीडिया रिपोर्टनुसार, 2010 मध्ये मुलाच्या सांगण्यावरुन पूजा आणि नीरज (एक्स नवरा) यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं. पण यावेळीही त्यांच्यात पहिल्यासारखं बॉण्डिंग राहिलं नव्हतं हे साऱ्यांनाच स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे दोघं पुन्हा एकदा वेगळे झाले. आता अखेर पूजाने नौशीरशी लग्न केलं आहे.

हेही वाचा-

भारत- न्युझीलंड सामन्यादरम्यान हा खेळाडू फिरतोय क्रोएशिया आणि इटलीत

‘मुस्लीम ज्वालामुखी होऊन फुटतील तेव्हा सर्व कलमा वाचायला लागतील,’ एजाज खान

World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

First published: July 10, 2019, 1:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading