Home /News /entertainment /

‘जेव्हा मुस्लीम ज्वालामुखी होऊन फुटतील तेव्हा सर्व कलमा वाचायला लागतील,’ एजाज खानचा VIRAL VIDEO

‘जेव्हा मुस्लीम ज्वालामुखी होऊन फुटतील तेव्हा सर्व कलमा वाचायला लागतील,’ एजाज खानचा VIRAL VIDEO

काही लोक त्याच्या व्हिडिओचं आणि त्याच्या विचारांचं समर्थन करत आहेत तर काहींनी त्याला कडाडून विरोध केला आहे.

    मुंबई, 09 जुलै- बॉलिवूड अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळीही तो आपल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. काही लोक त्याच्या व्हिडिओचं आणि त्याच्या विचारांचं समर्थन करत आहेत तर काहींनी त्याला कडाडून विरोध केला आहे. काहींनी तर त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याबद्दलही बोलत आहेत. एजाज खानने यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला एक मेसेज दिला आहे. पायलने शबाना आझमी आणि मुस्लिमांविरुद्ध काही टिपणी केली होती. या व्हिडिओत एजाज खान तिच्या याच वक्तव्यावर चांगलाच संतापलेला दिसत आहे. 4 मिनिट आणि 27 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एजाजने पायलने शबाना यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याची निंदा केली आहे. तसेच मुस्लिम जर बैलाचं मांस, कलेजी, पाय यांसारख्या गरम गोष्टी खालल्या तर जास्त मुलं होणारच. यावरच बोलताना व्हिडिओच्या सुरुवातीला एजाज म्हणाला की, ‘सुरुवातीला मी पायलला वहिनी म्हणून हाक मारायचो. कारण ती माझ्या मित्राची कुस्तीपटू संग्राम सिंहची बायको आहे. पण आता नाही. ती एक सी ग्रेड अभिनेत्री असून शबाना आझमीसारख्या अभिनेत्रीवर कमेंट करत आहे.’ व्हिडिओच्या पुढे एजाज असंही म्हणाला की, ‘पायल तू म्हणतेस की मुस्लीम एवढ्या मुलांना जन्म का देतात, तर ऐक.. जर मुस्लीम बैलाचं मांस खातात... पाय खातात.. कलेजी खातात.. गरम गोष्टी खातील तर...’ एवढंच नाही तर एजाज पुढे असंही म्हणाला की, ‘आता तर फक्त 56 देशांमध्ये मुस्लीम आहेत. कुराणमध्ये तर लिहीलं आहे की, एक दिवस संपूर्ण जगात मुस्लीम असतील.’ एवढंच बोलून तो थांबला नाही तर म्हणाला मुस्लीम बांधव सध्या अन्याय सहन करत आहे. पण एक दिवस ज्वालामुखीसारखा तो फुटेल तेव्हा पूर्ण जग कलमा वाचायला लागेल. एजाजचा हा व्हिडिओ पायल रोहतगीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत नवऱ्याला लिहिले की, ‘बघ ज्याचे तू गुणगाण गात होतास त्याचा खरा चेहरा काय आहे.’ पायल पुढे म्हणाली की, ‘तो मला सी ग्रेड अभिनेत्री म्हणतोय पण त्याने हे सांगितलं नाही की त्याने माझ्यासोबतच अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.’ World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव लग्नाच्या आठ वर्षांनंतर या अभिनेत्याच्या घरी आली ‘नन्ही परी’ या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार ‘याला तर इज्जत काढून घ्यायची सवयच लागली’, पुन्हा एकहा हृतिकवर भडकली रंगोली चंडेल EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर
    Published by:Madhura Nerurkar
    First published:

    पुढील बातम्या