अखेर आलिया भट्टच्या या खोलीत अजून होतं तरी कोण?

अखेर आलिया भट्टच्या या खोलीत अजून होतं तरी कोण?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटून भारतात परतले. मुंबईत आल्यानंतर आलियाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 08 जुलै- आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटून भारतात परतले. मुंबईत आल्यानंतर आलियाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या फोटोवर चाहते एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिने बाथरोब घातला आहे आणि आपलं नाक झाकलं आहे. या फोटोला कॅप्शन देत आलियाने ‘मूड’ असं म्हटलं आहे. या फोटोत कोणा एका व्यक्तिचा पायही दिसत आहे. असं वाटतं की त्या व्यक्तिनेच आलियाचा हा फोटो काढला आहे. आलियाचा हा फोटो रणबीर कपूरनेच काढला असेल असा तर्क युझर्स लावत आहेत. एका युझरने लिहिले हा कोणाचा पाय आहे असा प्रश्न विचारला असता दुसऱ्या एका युझरने रणबीर कपूरचा पाय आहे का असा प्रतीप्रश्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

मूड ☕️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

आलिया आणि रणबीर दोघंही त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. आलियाने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘नात्यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोन व्यक्ती आहोत जे स्वतःचं व्यावसायिक आयुष्य उत्तम पद्धतीने जगत आहोत. रणबीर त्याच्या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे आणि मीही तेच करत आहे. त्यामुळेच तुम्ही आम्हाला एकत्र पाहत आहात. हेच एका सहज नात्याचं लक्षण आहे.’

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. नुकतंच त्यांनी वाराणसी येथील शूट पूर्ण केलं. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

...म्हणून सपना चौधरीने विष घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न

या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है...’

सामन्या दरम्यान पंजाबी गाण्यावर थिरकली अनुष्का शर्मा, पाहा VIDEO

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 07:53 AM IST

ताज्या बातम्या