मुंबई, 07 जुलै- ICC Cricket World Cup मध्ये साखळी सामन्यातील शेवटचा सामना भारताने श्रीलंकेविरुद्ध खेळला. यात भारताने सात गडी राखून सहज विजय मिळवला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही हा सामना पाहायला मैदानात गेली होती. मैदानातील अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये अनुष्का पंजाबी गाणं ‘तारे गिन गिन’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सामना पाहताना आणि गाण्यावर थिरकता ती एवढी दंग होती की कॅमेऱ्या तिच्याकडे रोखला गेलाय हे तिला कळलंही नाही. थोड्यावेळाने तिची नजर कॅमेऱ्यावर गेली. तेव्हा तिला कळलं की, कॅमेऱ्या तिच्यावर रोखला गेला आहे. तिने बोट दाखवून कॅमेऱ्याकडे इशारा केला आणि जोरजोरात हसायला लागली.
.@AnushkaSharma cheering for @imVkohli post his boundary against Sri Lanka today 💕 #Virushka pic.twitter.com/yZdMNoiR5n
— Anushka Sharma FC™ (@AnushkaSFanCIub) July 6, 2019
याशिवाय सामन्यात असे अनेक क्षण होते जेव्हा अनुष्का संघाला चीअर करताना दिसली. यावेळी तिने खाकी रंगाचा ड्रेस घातला होता. सामन्याआधीही विराट आणि अनुष्का दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. या दरम्यान, अनुष्काने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. याआधाही विरुष्काचे लंडनमध्ये फिरतानाचे अनेक फोटो शेअर करण्यात आले होते. यावेळी दोघं मस्तीच्या मूडमध्ये होते. आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना अनुष्काने लिहिले की, ‘आनंदी मुली नेहमीच सुंदर दिसतात.’ एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का म्हणाली होती की, ‘आता पैशांसाठी सिनेमा करण्याची मला गरज नाही.’ VIDEO- बॉल पूलमध्ये फसली Sushmita Sen, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने अशी केली मदत बॉलिवूडचे ‘हे’ दोन स्टार सिनेमे सोडून बिहारमध्ये करत आहेत शेती एमएस धोनीच्या मुलीचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का? EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

)







