मुंबई, 07 जुलै- ICC Cricket World Cup मध्ये साखळी सामन्यातील शेवटचा सामना भारताने श्रीलंकेविरुद्ध खेळला. यात भारताने सात गडी राखून सहज विजय मिळवला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही हा सामना पाहायला मैदानात गेली होती. मैदानातील अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण त्यातही तिचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यावर तिचं कौतुक कमी आणि ती ट्रोलच जास्त होत आहे.
अनुष्का सामन्यादरम्यान तिच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिला चौकाराचं साइन काय असतं असा प्रश्न विचारताना दिसते. नेमकी हीच गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावरून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनुष्का विराटच्या फलंदाजीचा आनंद घेताना दिसत होती. विराटच्या एका शॉटवर ती सुरुवातीला फक्त टाळ्या वाजवताना दिसली. मात्र त्यानंतर तिने बाजूला बसलेल्या व्यक्तिला चौकाराचं साइन विचारलं. त्याने उत्तर दिल्यानंतर तिने लगेच हाताने ते साइन करत आपली प्रतिक्रिया दिली.
— Cricket Freak🙇🏼♂️ (@naveensurana06) July 6, 2019
आता उपांत्य फेरीत भारताचा सामना न्युझीलंडविरुद्ध होणार आहे. मँचेस्टर येथे हा सामना 9 जुलैला खेळणा जाईल. श्रीलंकाने भारताविरुद्ध 50 षटकांत 264 धावा केल्या. यानंतर भारताने अवघ्या 43.3 षटकांमध्ये तीन गडी गमावत 265 धावा करत सामना एकहाती जिंकला. सामन्यात रोहितने 103, केएल राहुलने 111 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार विराट कोहली 34 धावांवर नाबाद राहिला.
याशिवाय सामन्यात असे अनेक क्षण होते जेव्हा अनुष्का संघाला चीअर करताना दिसली. यावेळी तिने खाकी रंगाचा ड्रेस घातला होता. सामन्याआधीही विराट आणि अनुष्का दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. या दरम्यान, अनुष्काने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. याआधाही विरुष्काचे लंडनमध्ये फिरतानाचे अनेक फोटो शेअर करण्यात आले होते. यावेळी दोघं मस्तीच्या मूडमध्ये होते.
आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना अनुष्काने लिहिले की, ‘आनंदी मुली नेहमीच सुंदर दिसतात.’ एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का म्हणाली होती की, ‘आता पैशांसाठी सिनेमा करण्याची मला गरज नाही.’