मुंबई, 07 जुलै- प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने भाजप पक्षात प्रवेश केला. जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये मनोज तिवारीसह अन्य भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्यावेळीही सपनाने भाजप पक्षासाठी प्रचार केला होता. तेव्हापासून ती भाजप पक्षात प्रवेश करेल असं म्हटलं जात होतं. सपना चौधरीचं नाव आतापर्यंत अनेक विवादांमध्ये जोडलं गेलं. तिच्या आयुष्यात एक वेळ अशी होती की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अमर उजालाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, १७ फेब्रुवारी २०१६ च्या गुडगाव मधील चक्करपुर येथील एका कार्यक्रमात सपनाने ‘बिगडग्या’ ही रागनी गायली होती. या रागनीमध्ये तिने जातिचूचक शब्द गायले होते. नेमकी याच गोष्टीवर लोकांनी आक्षेप घेतला आणि तिच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.
हे सर्व झाल्यानंतर हरियाणवी म्युझिक कंपनी मोर म्युझिकने सपना चौधरीशी केलेले करार मोडले होते. तसेच कंपनीने तिच्याविरुद्ध न्यायालयीन कारवाई केली होती. याचप्रकरणी तिच्याविरुद्ध गुडगाव येथे एफआयआर दाखल करण्यात आली होती. यानंतर सोशल मीडियावर सपना चौधरीला ट्रोलही करण्यात आले होते. ती कशी चारित्र्यहिन आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी कंबर कसली होती. या सगळ्या गोष्टींना वैतागून तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सपना अनेक दिवस आयसीयूमध्ये दाखल होती. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा मीडियासमोर आली तेव्हा तिने आपल्या मनातले दुःख बोलून दाखवले. यावेळी सपना चौधरी म्हणाली की, सोशल मीडियावर तिच्याविरुद्ध अश्लिल शिवीगाळ करण्यात आली होती. एवढंच नाही तर लाइव्ह कार्यक्रमामध्येही अश्लील चाळे केले जात होते. या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार VIDEO- या मराठमोळ्या अभिनेत्रीचा बेली डान्स पाहून हृतिक झाला अवाक् VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है…’ सामन्या दरम्यान पंजाबी गाण्यावर थिरकली अनुष्का शर्मा, पाहा VIDEO EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

)







