Bigg Boss Marathi च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक

Bigg Boss Marathi च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक

Abhijeet Bichukle Bigg Boss Marathi साताऱ्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी अभिजीत बिचुकलेची ओळख आहे.

  • Share this:

सातारा, 21 जून- बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात चर्चेत राहिलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या घरातूनच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणी अटक केली. साताऱ्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी अभिजीत बिचुकलेची ओळख आहे. याच ओळखीवर त्याला बिग बॉसच्या घरात एण्ट्री मिळाली होती. मात्र आता अचानक त्याला घरातून बाहेर जावं लागत आहे. चेक बाउन्स प्रकरणात सातारा न्यायालयाने बिचुकलेच्या विरोधात वॉरन्ट जारी केलं आहे. याचप्रकरणी सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. मुंबई पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी बिचुकलेला ताब्यात घेतलं. उद्या अभिजीतला सातारा न्यायालयात हजर केलं जाणार असून तो स्पर्धेत कायम राहणार की नाही याचा निर्णय उद्याच घेण्यात येईल. दरम्यान, पोलीस बिग बॉसच्या घरात पोहोचल्यावर अभिजीत कोणताही वाद न घालत त्यांच्यासोबत घरातून बाहेर आला.

कोण भरवतं उदयनराजे भोसलेंच्या मनात धडकी?

अभिजीत बिचुकले आणि वाद

'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये महिलांवर आक्षेपार्ह शेरबाजी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली. मराठीतील एका शोमध्ये अभिजीत बिचुकलेने प्रतिस्पर्धी रुपाली भोसलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरला होता. बिचुकलेवर कारवाई करण्याची रितू तावडेंनी मागणी केली होती. बिचुकलेला घराबाहेर काढा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अशी मागणी त्यांनी केली.

बिग बॉसच्या घरात असा एकही दिवस नसेल जेव्हा अभिजीतचं कोणाशी भांडणं झालं नाही, एकीकडे त्याने सुरेखा पुणेकर यांना आई मानलं तर दुसरीकडे त्यांच्याचविरोधात कुरघोडी करताना दिसतो. कधी या ग्रुपमध्ये तर कधी त्या ग्रुपमध्ये जात प्रत्येक ठिकाणी वाद उकरून काढण्याचं काम सध्या तो बिग बॉसच्या घरात करत आहे. आता तो पुन्हा घरात जाईल की नाही हे पाहणं त्याच्या चाहत्यांसाठी आणि बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचे असणार आहे.

Bigg Boss Marathi 2- अभिजीत बिचकुलेंनी शिवानीसाठी गायले खास गाणे...

Big Bossच्या घरात भरली शाळा, प्रेमशास्त्रासोबतच मिळणार संगीत आणि इंग्रजीचे धडे

Bigg Boss Marathi 2- घरामध्ये रंगणार शेरास सव्वा शेर कार्य

International Day of Yoga: योगा केल्यानं मला खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी

First published: June 21, 2019, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading