Bigg Boss Marathi 2- घरामध्ये रंगणार शेरास सव्वा शेर कार्य

Bigg Boss Marathi 2- घरामध्ये रंगणार शेरास सव्वा शेर कार्य

अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसलेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. 'तू बोंबलत बसं मी चार क्रमांक सोडणार नाही,' असं बिचुकले रुपालीला म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 18 जून- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली म्हाडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यामध्ये वैशाली म्हाडे घराची नवी कॅप्टन झाली. तर आज बिग बॉसच्या घरामध्ये शेरास सव्वा शेर हे कार्य रंगणार आहे. यात सदस्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या स्थानावर उभे राहून चर्चा करायची आहे.

भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान सौरव गांगुलीला रणवीर सिंगने केले KISS

त्यानंतर त्यांच्या अंतिम स्थानावर उभे राहून त्यांच्या आधीच्या क्रमांकापेक्षा ते खाली का आहेत तसेच नंतरच्या क्रमांकापेक्षा वरचढ का आहेत याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. सर्व सदस्यांनी सामंजस्याने आणि विचारविनिमय करून सर्वानुमते निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडायची आहे. आता घरातील सदस्य किती सामंजस्याने आणि विचारपूर्वक ही प्रक्रिया पार पाडतील हे आजच्या भागात कळेलच.

शेरास सव्वा शेर या टास्कमध्ये अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. यात अभिजीत बिचुकले हे चार क्रमांकावर उभे आहेत आणि रुपालीच्या मते तो क्रमांक तिला हवा होता. कारण, बिचुकले यांनी काहीही काम केलेले नाही, तसेच ते टास्कमध्ये देखील फितूर होते.

…म्हणून शूटिंग अर्धवट सोडून Alia Bhatt मुंबईत परतली

तसेच रूपालीने बिचुकले यांना ते स्टाँग नसल्याचं सांगितलं. त्यावर बिचुकले  म्हणाले. रुपालीने केलेल्या एका वक्तव्यावर बिचुकले खूप चिडले आणि ते म्हणाले घरापर्यंत पोहचू नकोस... असं काय बोलली रुपाली की अभिजीत बिचुकले यांचा पारा चढला  आणि ते भांडण विकोपाला गेले.

VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या