Bigg Boss Marathi 2- अभिजीत बिचकुलेंनी शिवानीसाठी गायले खास गाणे...

Bigg Boss Marathi 2- अभिजीत बिचकुलेंनी शिवानीसाठी गायले खास गाणे...

‘हा दोन चुली करायला लागला आहे, त्याने जर चार लोकांचा स्वयंपाक केला तर आम्ही जास्त लोक आहोत आम्ही कुठे करायचा स्वयंपाक असा प्रश्न विचारला.’

  • Share this:

लोणावळा, 07 जून- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी इतर सदस्यांना वेगवेगळी नावं ठेवली आहेत. शाकाल म्हणजे पराग, बिल्डर म्हणजे शिव आणि बरचं काही... तर घरात पराग रुपालीला जुलिया रॉबर्ट्‌स म्हणतो. सध्या पराग आणि रुपालीबद्दल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्यामध्ये नक्की काय सुरू आहे याबद्दलची चर्चा सदस्यांमध्ये होताना दिसतेय. गोव्याविषयी चर्चा होत असताना गंमतीमध्ये पराग शिवसमोर रुपालीला त्याच्या घरी येण्याचे निमंत्रण देतो आणि आई बाबांना घेऊन ये मूंह दिखाई कर लेंगे, पोहे मी करेन. यावर शिव परागला तुमचं निश्चित झालं का असा प्रश्न विचारतो त्यावर ‘मी तिच्या मागे लागलो आहे पण ती होकार देत नाही,’ असं उत्तर देतो. इतर स्पर्धकांसमोर अशा गोष्टी होत असल्यामुळे आपसूक चर्चांना उधाण येतं. पराग किशोरी शहाणेंसमोर रुपालीबद्दलही भरभरून बोलताना दिसतो. आता या दोघांच्या मनामध्ये खरंच असं काही आहे की नाही हे त्यांनाच माहीत.

घटस्फोटाच्या एक वर्षानंतरच ज्वाला गुट्टाला डेट करतोय हा अभिनेता

घरात आता दोन ग्रुप पडलेले स्पष्ट दिसते. किचनमध्ये नेहा आणि किशोरीताई यांच्यात बराच वाद होतो. भांडणात नेहाचा आवाज बराच चढतो याची जाणीव तिला नंतर होते आणि ती माफीही मागते. पण या सगळ्यात ती जे काही किशोरीताईंना बोलली त्या भावनेविषयी ती माफी मागणार नाही असे तिने सांगितले. यावर किशोरीताईंनीही तिला अनेक खडे बोल सुनावले.

VIDEO- शाहरुख खानने चक्क गाडीच्या छतावर चढूनच चाहत्यांना दिलं सरप्राइज

या घरात नकारात्मकता पसरवू नकोस आणि डिव्हाइड अँड रूल करू नकोस, असंही त्या म्हणाल्या. या सगळ्यात पराग म्हणाला की, ‘खाण्यावरून या घरात राजकारण करू नका, नाहीतर आम्ही चार जणांच वेगळं करून घेऊ’. त्यावर नेहा म्हणाली की, ‘आम्ही कुठलेही राजकारण करत नाही. घरात जितकी माणसं तितक्या प्रवृत्ती. एकाचं म्हणणं कधीच दुसऱ्याला पटत नाही. एका अर्थाचा दुसरा अर्थ काढण्यात माणूस पटाईत असतो. प्रत्येकजण दुसऱ्याच्या बोलण्याचा त्याला हवा तसा, त्याच्या सोयीने अर्थ काढतो आणि त्यावरूनच गैरसमज होतात.’

सिनेमात राष्ट्रगीतावेळी हॉलमध्ये उभे राहिल्याबद्दल सलमानने मानले आभार, म्हणाला ‘जय हिंद’

परागने त्याचं म्हणणं इतर सदस्यांनादेखील सांगितलं. त्यावर सुरेखाताई म्हणाल्या की, ‘एकाच घरात वेगळी चूल मांडायला नको, त्याने घरामध्ये भांडण होतील.’ पण या घरात भांडण होणार नाही याची जबाबदारी परागने घेतली. परागचे हे बोलणे आणि हा उपाय सुरेखाताईना पटला नाही. त्यांनी बिग बॉसला याला घरातून बाहेर काढायला सांगितले. ‘हा दोन चुली करायला लागला आहे, त्याने जर चार लोकांचा स्वयंपाक केला तर आम्ही जास्त लोक आहोत आम्ही कुठे करायचा स्वयंपाक असा प्रश्न विचारला.’  या सगळ्यात अभिजीत बिचुकले हे खास शिवानीसाठी तुमसे मिलना, बाते करना हे गाणं गाताना दिसणार आहेत.

अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कारावर चिडलं बॉलिवूड, आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी

रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग?

First published: June 7, 2019, 5:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading