मुंबई, 12 जून : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असणाऱ्या शाळा सुटली पाटी फुटली या कार्यामध्ये सदस्य विद्यार्थी बनून बराच दंगा घालत आहेत. आज प्रेम शास्त्राबरोबर संगीत आणि इंग्लीशचे क्लास देखील घरामध्ये भरणार आहेत. संगीताचा तास वैशाली माडे तर इंग्रजीचा अभिजीत बिचुकले घेणार आहेत. सदस्य या क्लास मध्ये देखील बरीच धम्माल मस्ती करतील यात शंका नाही.
घरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा
कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सरळ देतील ते विद्यार्थी कुठले आणि हे तर बिग बॉसच्या घरातील सदस्य. वैशालीने विद्यार्थीना जेंव्हा विचारले संगीत म्हणजे काय? तेंव्हा विद्याधर जोशी म्हणाले 'संगीता'बद्दल मला नाही माहिती. संगीताबद्दल नाही तर गाण्याबद्दल बोलणे सुरु आहे असे वैशालीने सांगितलं. शेवटी सदस्यांच्या उत्तरांना आणि कल्ल्याला त्रस्त होऊन वैशालीने सांगितले गाण म्हणणे, नाच करणे आणि एखाद वाद्य वाजवणे या तीन गोष्टींचा जिथे संगम होतो त्याला संगीत म्हणतात. यावर देखील दिंगबर नाईक यांचे उत्तर फारच गंमतीदार होते 'मला वाटलं लग्नाच्या आदल्या दिवशी जो कार्यक्रम होतो त्याला संगीत म्हणतात.'
हृतिक रोशनसोबत असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
BB विद्यालयमध्ये अभिजीत बिचुकले यांचा इंग्रजीचा तास देखील रंगणार आहे. हा क्लास घरामध्ये विशेष गमतीशीर असणार आहे. पराग आणि विणाने या क्लास मध्ये बिचुकले यांच्यासोबत बरीच धम्माल केली. बिचुकलेंचा इंग्लीशमध्ये बोलण्याचा प्रयत्न पूर्णपणे दिसून येणार आहे. बिग बॉस यांनी सदस्यांवर हे कार्य सोपवून घरामध्ये वेगळीच गंमत आणली आहे. त्यावरूनच आज कोण नापास होईल ? कोण कॅप्टनसीच्या टास्क मधून बेदखल होईल कळेलच.
VIDEO : मराठीतील आत्तापर्यंतचं सगळ्यात बोल्ड गाणं रिलीज
याशिवाय पराग कान्हेरे प्रेम शास्त्र हा विषय शिकवणार आहे आणि म्हणूनच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिक देऊन. यासाठी परागने रुपाली भोसलेसोबत डान्स सादर केला. ज्यावरून घरातील सदस्य पराग आणि रूपालीला बरेच चिडवताना दिसणार आहेत. “तेरे से मॅरेज करने को मै” या गाण्यावर पराग आणि रुपालीने डान्स केला आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि घराबाहेर रुपाली आणि परागबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत. त्यात किती सत्य आहे हे त्यांनाच ठाऊक. पण हा डान्स आणि प्रेमशास्त्राचा क्लास घरातील सदस्यांनी बराच एन्जॉय केला आणि तो आज प्रेक्षक देखील करतील.