मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron चा धोका खरंच किती मोठा? भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का?

Omicron चा धोका खरंच किती मोठा? भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का?

Coronavius चा नवा अवतार असलेल्या Omircorn मुळे जगभरात दहशत पसरली आहे. खरंच या विषाणूच्या म्युटेशनचा भारतालाही धोका आहे का? आकडे आणि तज्ज्ञ काय सांगतात? ओमिक्रॉनबद्दल सगळी माहिती...

Coronavius चा नवा अवतार असलेल्या Omircorn मुळे जगभरात दहशत पसरली आहे. खरंच या विषाणूच्या म्युटेशनचा भारतालाही धोका आहे का? आकडे आणि तज्ज्ञ काय सांगतात? ओमिक्रॉनबद्दल सगळी माहिती...

Coronavius चा नवा अवतार असलेल्या Omircorn मुळे जगभरात दहशत पसरली आहे. खरंच या विषाणूच्या म्युटेशनचा भारतालाही धोका आहे का? आकडे आणि तज्ज्ञ काय सांगतात? ओमिक्रॉनबद्दल सगळी माहिती...

नवी दिल्ली, 3 डिसेंबर: कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट (Coronavirus second wave) आटोक्यात येत असतानाच दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हॅरिएंट आढळल्याने सगळ्यांच्याच छातीत धस्स झालं आहे. जगभरातल्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तरीही काही देशांमध्ये ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग झाला असून, भारतातही या व्हॅरिएंटचे (New Variant of coronavirus in India) दोन रुग्ण कर्नाटकात आढळले (Third wave of ) आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या व्हॅरिएंटच्या अनुषंगाने फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (FAQ on Omicron) अर्थात वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं प्रसिद्ध केली आहेत. हा व्हॅरिएंट जास्त वेगाने पसरणारा आणि चिंता वाढवणारा अर्थात व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न (Variant of Concern) असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. भारतात हा नवा कोरोना व्हायरस कोरोनाची तिसरी लाट आणणार का?

कर्नाटकात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 66 वर्षांचा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असून, तिथून निघताना त्याने केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. दुसरा रुग्ण 46 वर्षांचा स्थानिक नागरिक असून, त्याने कुठेही प्रवास केलेला नव्हता.

कोविड-19 कृती दलाच्या सदस्याने सांगितलं, की सतर्कता आणि काळजीची कडक अंमलबजावणी, जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing), सीमांवर सर्वेक्षण आणि लसीकरण आदींची कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटशी दोन हात करण्यासाठी नितांत आवश्यकता आहे.

Omicron पसरतो पाचपट वेगानं, पण कुठलीही गंभीर लक्षणं नाहीत!

दिल्ली आणि मुंबईच्या विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांची कोविड-19 चाचणी (Covid19 Test) करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर आणि त्यातही धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नवा व्हॅरिएंट जास्त संसर्गजन्य असला, तरी त्याची घातकता कमी आहे; मात्र तरीही डेल्टा किंवा अन्य कोविड व्हॅरिएंट्सच्या तुलनेत त्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, तसंच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन व्हॅरिएंटसंदर्भातल्या काही प्रश्नांची उत्तरं येथे देत आहोत.

- ओमिक्रॉन म्हणजे काय आणि तो व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न का आहे?

- ओमिक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवा व्हॅरिएंट दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर रोजी आढळून आला. त्याला सुरुवातीला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आणि त्यानंतर ग्रीक मुळाक्षरांमधल्या 15 व्या अक्षरावरून ओमिक्रॉन हे नाव देण्यात आलं. कोरोना विषाणूचं स्पाइक प्रोटीन हा संसर्गासाठीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. कारण त्याच्या साह्याने विषाणू मानवी पेशीत प्रवेश करतो.

परदेश प्रवास न करताही Omicronची लागण; भारतात सापडलेल्या रुग्णाबाबत धक्कादायक माहिती

 या प्रोटीनमध्ये ओमिक्रॉनमध्ये 30हून अधिक म्युटेशन्स आढळून आली आहेत. पूर्वी अशा प्रकारच्या म्युटेशन्समुळे दक्षिण आफ्रिकेत संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने या व्हॅरिएंटला व्हॅरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीत घेतलं आहे.

- नव्या व्हॅरिएंटच्या अनुषंगाने किती काळजी घेणं गरजेचं आहे?

- व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित करताना जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनसारख्या पूर्वी झालेल्या म्युटेशन्समुळे (Mutations) घडलेले गंभीर परिणाम लक्षात घेतले आहेत. यामुळे संसर्गक्षमता वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे करोनाविषयक योग्य ते प्रोटोकॉल्स पाळणं अत्यावश्यक आहे.

- तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता आहे का?

- ज्या दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन पहिल्यांदा सापडला, तो वगळता अन्य अनेक देशांत ओमिक्रॉनचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्याचे गुणधर्म पाहता भारतासह अन्य अनेक देशांमध्ये तो पसरण्याची शक्यता आहे. ही वाढ किती होऊ शकते आणि ती किती घातक ठरू शकते, यात अद्याप स्पष्टता नाही.

Explainer: कसा लागला ओमिक्रॉनचा शोध? विषाणूचे नवीन प्रकार शोधण्याची पद्धत कोणती?

सध्या भारतातला लसीकरणाचा चांगला असलेला वेग आणि डेल्टा व्हॅरिएंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊन गेलेला असल्याने आता यापुढच्या संसर्गांची तीव्रता कमी असण्याची अपेक्षा आहे; मात्र याबद्दलचे शास्त्रीय पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत.

- सध्याच्या लशी (Vaccine Effectivity) ओमिक्रॉनविरोधात उपयुक्त आहेत का?

- ओमिक्रॉनविरोधात सध्याच्या लशी काम करत नसल्याचा कोणताही पुरावा अद्याप हाती आलेला नाही; मात्र ओमिक्रॉनमधली काही म्युटेशन्स अशा प्रकारची आहेत, की जी लशींचा प्रभाव कमी करू शकतात. लशींमुळे मिळणारं संरक्षण हे अँटीबॉडीजच्या निर्मितीतून आणि पेशींच्या प्रतिकारशक्तीद्वारेही मिळतं. त्यामुळे गंभीर आजार होण्यापासून लशी संरक्षण करू शकतात, अशी अपेक्षा आहे.

Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी: ICMR

त्यामुळे लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे.

- कोणत्या स्वरूपाची काळजी घ्यायला हवी?

- मास्कचा वापर, हाताची स्वच्छता, लशीचे दोन्ही डोस घेणं आणि सामाजिक अंतर, खोल्यांमध्ये हवा खेळती ठेवणं या गोष्टी अत्यावश्यक आहेत.

- भारताचा प्रतिसाद कसा आहे?

- केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करत आहे. अचूक निदान, जनुकीय सर्वेक्षण, ओमिक्रॉनची संसर्गक्षमता ओळखणं आणि उपचारपद्धती या अनुषंगाने वैद्यकीय आणि शास्त्रज्ञ समुदाय वेगाने कामाला लागला आहे.

भारतातही देणार Corona vaccine चा Booster dose; Omicron संकटात मोदी सरकारचा मोठा निर्णय

 - सध्याच्या पद्धतींतून ओमिक्रॉनचा छडा लागू शकतो का?

- सध्या आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) कोविडच्या निदानासाठी वापरली जात आहे. या पद्धतीतून विषाणूच्या शरीरातले स्पाइक, एन्व्हेलप्ड, न्यूक्लिओकॅप्सिड असे विशिष्ट जीन्स ओळखले जातात. ओमिक्रॉनमध्ये स्पाइक जीनमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युटेशन झालं आहे. त्यामुळे हा जीन उपस्थित नसल्याचं या चाचणीतून दिसू शकतं. याला एस जीन ड्रॉप आउट असं म्हटलं जातं. त्यामुळे एस जीन ड्रॉप आउट स्थिती आणि अन्य जीन्सची उपस्थिती या दोन्हींची सांगड घालून ओमिक्रॉनचं निदान होऊ शकतं; मात्र फायनल कन्फर्मेशनसाठी जीनोम सिक्वेन्सिंग करणं अत्यावश्यक ठरतं.

- व्हॅरिएंट्स (Variants) का तयार होतात?

- विषाणूचे व्हॅरिएंट्स तयार होणं ही उत्क्रांतीच्या चक्रातली एक नॉर्मल गोष्ट आहे. जोपर्यंत विषाणू संसर्गजन्य असतो, पुनरुत्पादन करू शकत असतो आणि पसरू शकत असतो, तोपर्यंत त्यामध्ये उत्क्रांती होऊन त्याचे व्हॅरिएंट्स तयार होत राहतात. सर्व व्हॅरिएंट्स धोकादायक नसतात आणि अनेकदा ते लक्षातही येत नाहीत. जेव्हा ते अधिक घातक असतात आणि त्यांच्यात पुन्हा संसर्ग करण्याची ताकद असते, तेव्हाच त्या व्हॅरिएंट्सना महत्त्व प्राप्त होतं. संसर्गग्रस्तांची संख्या कमी होणं हा व्हॅरिएंट्सच्या संख्येला आळा घालण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19